शंकरराव निबाळकर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिपक गुंड यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उपळे दुमाला येथील वखारिया विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
दीपक गुंड सर यांच्या सत्कारानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डी. एस. रेवडकर सर, प्रमुख पाहुणे महेश बुरगुटे सर होते. यावेळी त्यांनी भाषा विषयातील व्याकरणाचे महत्व व डॉ. दिपक गुंड सर लिखित इंग्रजी ग्रामर या पुस्तकाची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली तसेच प्राचार्य गुंड यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी मराठी सोबत इंग्रजी विषयाचा पाया भक्कम असणे गरजेचे असल्याचे सांगितले.
या सत्कार सोहोळ्याचे सूत्रसंचलन एन.एन. महाले सर यांनी केले. यावेळी एस. के. शिंदे सर, एस. ए. सोनके सर, आर. आर. लंकेश्वर सर, डी. डी. राऊत सर, व्ही. व्ही. शिदे सर, ए. आर. वैद्य सर, एम. एस. जगदाळे सर, सी.एस. तवले मॅडम, ए. ए. शेंडगे सर, आर. आर. डोईफोडे मॅडम, डी. बी. धनके सर, एन. व्ही. वाघ मामा, एम. एस. सुरवसे मामा व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर