वाय पी एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व शाखांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण मॉडेल हायस्कूल चे मुख्याध्यापक भारत पवार यांच्या हस्ते करण्यात आले निवृत्त शिक्षक श्री राजेंद्र शेटे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव नागनाथ देवकते यांनी केले या वेळी विद्यार्थ्यानी देशभक्तीपर गीते सादर केली. सर्व शाखामधील गुणवंत विद्यार्थी व शिक्षक यांचे सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख पाहूणे भारत पवार सर यांनी सेवाकाळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी शशिकांत गोडगे रहिमतुल्ला तांबोळी दिवाकर नारकर, दिनेश कांकरिया वैशाली टिळक. पुष्पा मोहिते वैष्णवी हातोळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका प्रज्ञा वाघमारे यांनी केले सुत्रसंचालन प्रताप दराडे व उमा लंगोटे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार