Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > डॉ. बाबासाहेबआंबेडकर जयंतीनिमित्त सर्व व्यवस्थापन – माध्यमांच्या शाळांमध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन

डॉ. बाबासाहेबआंबेडकर जयंतीनिमित्त सर्व व्यवस्थापन – माध्यमांच्या शाळांमध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन

बार्शी शहर व परिसरात सर्व शाळांमध्ये डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
मित्राला शेअर करा

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यातील सर्व व्यवस्थापन-माध्यमांच्या शाळा आणि अध्यापक विद्यालयांमध्ये विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करून. यामध्ये विद्यार्थ्यांसह सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन शालेय शिक्षणमंत्री यांनी केले होते.

या आव्हानाला प्रतिसाद देत बार्शी शहर व परिसरात सर्व शाळांमध्ये डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

जयंती निमित्त सर्व शाळांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री.जी.ए. चव्हाण सर ,श्री आर.बी सपताळे सर, प्रा. किरण गाढवे सर, प्रा.सचिन भोसले सर, श्री.सुनिल दास सर (पालक) व श्री. महांगडे सर (पालक)यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थिनी कु. श्री महांगडे व विद्यार्थी चि. अमित दास यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्षमय जीवन प्रवास व त्यांनी केलेले सामजिक कार्य या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जेष्ठ शिक्षक श्री. आर. बी सपताळे सर व सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सिल्वर ज्युबिली हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. प्रशांत कोल्हे सर उपमुख्याध्यापक श्री अनिरुद्ध चाटी सर पर्यवेक्षिका सौ विश्र्वेकर मॅडम व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित श्री संतोष गुळमिरे प्राथमिक विद्यामंदिर बार्शी या शाळेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरवात डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा शाळेच्या शिक्षीका राजश्री निंबाळकर यांनी सांगीतला या दिवशी शाळेत रांगोळी स्पर्धा घेतल्या या कार्यक्रमासाठी स्वाती मुंढे (मुख्याध्यापिका ) निहाल शेख, गणेश कदम, राजश्री निंबाळकर, राजु अंखडेकर शाळेच्या सर्व शिक्षकांचे परीश्रम घेतले.

के. एन. भिसे आर्टस्, कॅामर्स ॲण्ड विनायकराव पाटील सायन्स कॅालेज, विद्यानगर, भोसरे येथे महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली प्र. प्राचार्य डॉ. पी. एस. कांबळे सर, मा. प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील सर, मा. आमदार विनायकराव पाटील, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.