सविस्कर वृत्त असे की, दिनांक 8/11/2021 वार सोमवार रोजी करवंद नाका येथे जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान च्या वतिने व काही दानशूर मंडळी च्या अप्रतिम आर्थिक स्वरुपाच्या सहकार्याने दिवाळी व भाऊबीज निमित्त 300 निराधार व गरजू महिलांना साडी चा आहेर व फराळ वाटप करण्यात आले.
तालुक्याचे तहसीलदार आबा महाजन, पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे,माजी जिल्हा.प.उपाध्यक्ष देवेंद्र पाटिल,शिक्षण मंडळ डायरेक्टर सुरेश सिताराम चौधरी,सुनील सोनवणे – सरपंच मांडळ, राजेंद्र पाटिल- सरपंच अजंदे,आनंदसिंग राऊळ – संचालक सुतगिरणी, भीमसिंग राजपुत – माजी सरपंच लौकी,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त – भिखारी पवार,रावसाहेब भालचंद्र वाघ,रावसाहेब पद्माकर शिरसाठ, दिसान टेक्सटाइल पार्कचे ए. जी.एम. शरद फुलपगारे
यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते
दिवाळी व भाऊबीज निमित्त 300 निराधार व गरजू महिलांना साडी चा आहेर व दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
या वेळी तहसीलदार आबा महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे सेवाभावी कार्य खुपच पारदर्शी आहेत त्या मुळे या पुढे देखील गोरगरिबांच्या सेवेसाठी प्रशासनाच्या वतीने विकास सेन यांना योग्य ती सर्व मदत केली जाईल व मा.उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की मागील 4 वर्षापासून प्रतिष्ठान चे सेवाभावी कार्य आम्ही बघत आहोत प्रतिष्ठान चे सर्वच सेवाभावी कार्य अतिशय कौतुकास्पद असतात त्या मुळे प्रतिष्ठानच्या या पुढील सर्वच सेवाभावी कार्यक्रमाला माझे स्वतःचे शकुंतलाई लॉन्स निशुल्क उपलब्ध करून देईल असे आश्वासन देण्यात आले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर पाटिल सर यशवंत निकवाडे सर व संदीप चौधरी सर यांचे अप्रतीम सहकार्य लाभले
कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष विकास सेन,उपाध्यक्ष श्रीरामचंद्र येशी,सचिव हेमलता येशी,खजिनदार कुलदीप राजपूत,विश्वस्त चंद्रकांत बाविस्कर यांनी केले होते
कार्यक्रम प्रसंगी विकास सेन यांनी सर्वच दानशूर मंडळी यांचे मनस्वी आभार मानले.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्याच्या एमआयटी विद्यापीठाचा जेष्ठ संपादक राजा माने यांना ‘समर्पित जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर