धाराशिव:- दि.1 मे
1 मे महाराष्ट्र स्थापना दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या संकल्पनेतून तृत्तीयपंथी देवांशी काकडेकडून संचलित आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधिक्षक संजय जाधव, अपर पोलिस अधिक्षक अशफत आमना, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, उपविभागीय अधिकारी अरुणा गायकवाड, समाजकल्याणचे सहायक आयुक्त बाबासाहेब अरवत, तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांच्यासह महसुल विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
आपले सरकार सेवा केंद्रातून नागरिकांना विविध शासकीय योजना, उत्तन्न, जात, रहिवासी, वय,अधिवास व राष्ट्रीयत्व यासह अन्य प्रमाणपत्रे आणि अर्ज प्रक्रिया यासाठी या केंद्रातून मदत करण्यात येणार आहे, जेणेकरुन नागरिकांना सरकारी कार्यालयात वारंवार जावे लागणार नाही. या केंद्रामुळे तृत्तीयपंथी देवांशी काकडे यांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
More Stories
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न
जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award
आज ११ वाजता बार्शी तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत कार्यक्रम