Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > गौडगांव व तांबेवाडी येथील साठवण तलावासाठी साडे १४ कोटींचा निधी – आमदार राजाभाऊ राऊत

गौडगांव व तांबेवाडी येथील साठवण तलावासाठी साडे १४ कोटींचा निधी – आमदार राजाभाऊ राऊत

गौडगांव व तांबेवाडी येथील साठवण तलावासाठी साडे १४ कोटींचा निधी - आमदार राजाभाऊ राऊत
मित्राला शेअर करा

सदरचे साठवण तलाव मंजूर करण्यासाठी व निधी उपलब्ध करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी विशेष शिफारस करून मदत केली असल्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.

बार्शी तालुक्यातील तांबेवाडी येथील नव्याने करण्यात येणाऱ्या साठवण तलावासाठी ८ कोटी, १४ लाख, ६४ हजार, ८५९ रुपये व गौडगांव येथील साठवण तलावास ६ कोटी, ३१ लाख, ५४ हजार, ५८५ रुपये, असे एकूण १४ कोटी, ४६ लाख, १९ हजार, ४४४ रुपयांचा निधी मंजूर झालेला असल्याची माहिती आमदार राजाभाऊ राऊत यांनी दिली.

सदरच्या योजनेस महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ मार्फत निधी उपलब्ध झाला असून साठवण क्षमता प्रस्तावित केली आहे. प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग पुणे, यांनी नव्याने पाणी उपलब्धता प्रमाणपत्राची आवश्यकता नाही असे प्रमाणित केलेले आहे. सदर योजनेच्या प्रशासकीय मान्यता अंदाजपत्रकानुसार गौडगांव येथील तलावाची साठवण क्षमता ३५०.२३ स.घ.मी. असून, तांबेवाडी येथील तलावाची साठवण क्षमता ४५१.०५ स.घ.मी. इतकी आहे. दोन्ही साठवण तलावाची साठवण क्षमता ८०१.२८ स.घ.मी. असून नियोजीत एकूण सिंचन क्षमता १६८ हेक्टर इतकी आहे.

सदर योजनेसाठी लाभधारकांची पाणी वापर संस्था स्थापन करणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे पाणी वापर संस्थेमार्फत देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी हस्तांतर करण्यास सहमती ठरावाद्वारे मान्यता घेणे आवश्यक आहे. सदरची योजना देखभाल दुरुस्ती साठी नियमानुसार हस्तांतरित करावी लागणार आहे.

आत्ता पर्यंत आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळण्यासाठी लघू प्रकल्प, मध्यम प्रकल्प, साठवण तलाव मंजूर करून घेतलेले आहेत. यातील अनेक प्रकल्प पूर्ण झालेले असून, याचा फायदा या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मिळत आहे.

बार्शी तालुक्यात हरीत क्रांतीचे सतत स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आमदार राजाभाऊ राऊत यांनी, बार्शी तालुक्यातील अनेक ठिकाणी साठवण तलाव करण्यासाठी शासन दरबारी पत्रव्यवहार करून सतत पाठपुरावा केला होता.