Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > गौडगाव ता. बार्शी ग्रामपंचायतीस व्यसनमुक्ती पुरस्कार

गौडगाव ता. बार्शी ग्रामपंचायतीस व्यसनमुक्ती पुरस्कार

मित्राला शेअर करा

बार्शी – गौडगाव ग्रामपंचायतीस लायन्स क्लब बार्शी रॉयल व आयुष व्यसनमुक्ती केंद्र बार्शी यांच्यावतीने व्यसनमुक्ती ग्राम अभियान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे, नगरसेवक विजय राऊत, प्रांतपाल सुनील सुतार, बार्शी लायन्स क्लब रॉयल चे अध्यक्ष गणेश भंडारी आणि डॉ. संदीप तांबारे यांच्या उपस्थितीमध्ये गौडगाव ग्रामपंचायतीस व्यसनमुक्ती ग्रामअभियान हा पुरस्कार देण्यात आला. ट्रॉफी, प्रमाणपत्र, रोख स्वरूपात २३ हजार रुपयाचे बक्षीस आणि गावविकासासाठी ८ लाख रुपयांचा निधी असे बक्षीसाचे स्वरूप आहे.
यावेळी सरपंच स्वाती पैकेकर, उपसरपंच उमा शिंदे, राहुल भड, हिराचंद शिंदे, नागेश काजळे, सुशांत सुरवसे, बालाजी पैकेकर, साधना भड, मैनाबाई अरगडे आदी उपस्थित होते.

आयुष्यात कधीही दारु न पिणाऱ्या व्यक्तींचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान

गौडगाव ग्रामपंचायतीचे स्तुत्य उपक्रम
आयुष्यात कधीही दारु न पिणाऱ्या व्यक्तींचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान.
या पुर्वी गौडगाव ता. बार्शी येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ज्या व्यक्तीने आयुष्यात कधीही दारू न पिणाऱ्या २५ ग्रामस्थांना गौडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.


उल्हासनगर महानगरपालिकेचे मुख्य लेखाधिकारी मा. विकास चव्हाण साहेब व गौडगांवचे सरपंच सौ. स्वाती बालाजी पैकेकर यांच्या उपस्थितीत दारू न पिणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आहे.
या वेळी व्यसनमुक्ती उपचार व संशोधन केंद्रातील डॉ. मृणालिनी मोरे, सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, ग्रामपंचायत सदस्य नागेश काजळे, सुशांत सुरवसे, मदन आरगडे, भास्‍कर काकडे, प्रभाकर भड, निखिल देशमुख, रघुनाथ गरड, बालाजी भड आदींच्या उपस्थितीत होते.