तेर प्रतिनिधी :- प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेर ता धाराशिव येथील राज्यभरातील लाखो भाविक भक्तांसह वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या संतश्रेष्ठ श्री संत गोरोबा काकांचा दिनांक २३ ते ३० एप्रिल या कालावधीत संपन्न होणारा वार्षिक समाधी सोहळा सुरळीत पार पाडून या सोहळ्याची राज्यभरात एकप्रकारे वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी ग्रामस्थांसह प्रशासकीय यंत्रणांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रीत येऊन परिश्रम करण्याचे आवाहन तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांनी केले.

संतश्रेष्ठ श्री संत गोरोबा काकांच्या वार्षिक समाधी सोहळ्यास दिनांक २३ एप्रिल पासून प्रारंभ होत असून त्यानुषंगाने संत गोरोबा काका मंदिरात मंगळवारी तहसीलदार डॉ. मृणाल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार, मंदिर समितीच्या प्रशासक तथा सहाय्यक धर्मादाय आयुक्त रूपाली कोरे, ढोकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विलास हजारे, सरपंच दिदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी बोलताना डॉ. मृणाल जाधव म्हणाल्या की यात्रा काळात येणाऱ्या भाविक भक्तांसह वारकऱ्यांना संबंधित विभागाने कामात कसूर न करता सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अन्याथा कामात हयगय करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल तसेच सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी दिनांक २० एप्रिल पर्यंत समाधी सोहळ्या संबंधित कामे पूर्ण करण्याच्या सक्त सूचना धाराशिवच्या तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी संबंधित विभागांना दिल्या.
अवैध धंदे चालू देणार नाही डी.वाय.एस.पी संजय पवार :- याञेत दारू, सुरड, जुगार यासारखे अवैध धंदे चालू देणार नाही अशी माहिती कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी दिली भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्याची सुचनाही संजय पवार यांनी केली यावेळी मंदिर समितीचे निरिक्षक अतूल नळणीकर, ग्राम विकास अधिकारी बाबासाहेब खोचरे, मंडळ अधिकारी शरद पवार, तलाठी प्रशांत देशमु, वैद्यकीय अधिक्षक डॉ.गुरूबस शेटे, माजी सरपंच नवनाथ नाईकवाडी, रविराज चौगुले, बालाजी पांढरे, ग्रा प सदस्य नवनाथ पसारे, बापू नाईकवाडी, धनंजय आंधळे, नामदेव कांबळे राजेंद्र आंधळे, पाटबंधारे विभागाचे धनंजय वरपे, महावितरणचे अमोल कोळे, मंदिर समितीचे व्यवस्थापक साहेबराव सौदागर, बीट अंमलदार प्रदीप मुरळीकर, जि.वि.शाखेचे सांगळे, अमोल सावंत, दैवशाला भोरे, वारकरी संप्रदायाचे जिल्हा अध्यक्ष महादेव तांबे यांच्यासह, पत्रकार, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत सदस्य नागरिक उपस्थित होते.
नियोजन बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी – कारणे दाखवा नोटीस बजावणार
तालुक्यातील संत गोरोबा काकांची सर्वात मोठी यात्रा असताना ही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्वाची भुमिका असताना ही नियोजन बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या अधिकारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांनी सांगितले
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम 2.0 विशेष आरोग्य तपासणी मोहिमेचा शुभारंभ