अभंग
आले आले रे हरीचे डिगर |
वीर वारकरी पंढरीचे ||
ज्याची चरण धुळी उधळे गगनपथे |
ब्रम्हदिका तेथे जाली वाटी ||
एकमेका पुढे लवविता माथे |
म्हणती आम्हा ते लागो रज ||
भक्ती प्रेमभाव भरले ज्याची अगी |
नाचती हरिरगी नेणती लाजू ||
तेर प्रतिनिधी : – तेर येथील वैराग्य महामेरू श्री संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा हरीनामाचा जयघोष करत रविवार दि.२८ रोजी सायंकाळच्या सुमारास तेर नगरीत दाखल होताच ग्रामस्थांनी फटाक्यांची करण्यात आली दरम्यान सरपंच नवनाथ नाईकवाडी, उपसरपंच रविराज चौगुले यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले यावेळी समाधी मंदिराच्या आवारात व तेरणा नदीच्या घाटावर ग्रामस्थांच्या वतीने हजारो दिवे लावण्यात आल्याने नयनरम्य सोहळा पहाण्यासाठी भाविकांनी मंदिरासह परिसरात गर्दी केली होती
तेर ता उस्मानाबाद येथील वारकरी संप्रदायातील थोर संत संतशिरोमणी श्री संत गोरोबा काका यांचा पायी पालखी सोहळा प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी भाऊबीजेच्या दिवशी म्हणजेच दि ६ नोव्हेंबर २१ रोजी पंढरपूरातील कार्तिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी शेकडो वारक-याच्या लवाजम्यासह रवाना झाला होता
दशमी ते पोर्णिमे पर्यंतचा कार्तिक सोहळा संपवून दिनांक १९ नोव्हेंबर रोजी तेरच्या दिशेने प्रस्थान झालेल्या संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा येवती , खंडोबाचीवाडी , कुंभेज , कापसेवाडी , काळेगाव , सावरगाव पिंपरी , कौडगाव , सांजा , काजळा या मार्गे पायी प्रवास करत रविवार दिनांक २८ रोजी टाळ मृंदगाच्या तालावर हरी नामाचा जयघोष करत सायंकाळच्या सुमारास दाखल झाला यावेळी गावातील महिलांनी पालखीच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा आकर्षक रांगोळी काढल्या होत्या तसेच ग्रामस्थांकडून रोषणाई सह फटाक्यांची आतषबाजी करत पालखीचे स्वागत करण्यात आले
यावेळी तेरसह परिसरातील भाविकांनी पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी गर्दी केल्याने सर्वत्र भक्तीमय वातावरणात निर्माण झाले होते यावेळी परंपरेने ठरलेल्या ठिकाणी भारुडाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर त्रिवीक्रम मंदिरात कीर्तन सेवा संपन्न झाली गोरोबा काकांच्या राहत्या घरी पालखीची आरती झाल्यानंतर तब्बल २२ दिवसांपासून सुरू असलेल्या पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली
पालखी सोहळ्या निमित्ताने यंदा प्रथमच तेर ग्रामस्थांच्या वतीने दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते तेरणा नदीच्या घाटावर व मंदिर परीसरात जवळपास तीन हजार दिप लावण्यात आले होते हा नयनरम्य सोहळा पहाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
More Stories
विधानसभा तालिका सभाध्यक्षांची नियुक्ती जाहीर
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद