शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या तसेच कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचा शेतकर्यांचा पुर्वी पासुन कल आहे कारण या व्यवसायातून दैनंदिन खर्चासाठी लागणारा पैसा उपलब्ध होऊ शकतो, याचबरोबर याचबरोबर पशुपालन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला तर स्वतंत्र व्यवसाय म्हणून चांगले उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे.
अलीकडील काळात सुशिक्षित तरुण सुद्धा हमखास उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे आकर्षित होत आहेत.या व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाकडून सुद्धा अर्थीक व इतर स्वरुपात मदत करणाऱ्या अनेक योजना राबविण्यात येतात यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अणि योग्य पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलबध करुन देण्यासाठी शासना मार्फत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबवण्यात येतात या योजनांची प्रक्रीया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरु करण्यात आली आहे. याबरोबरच जिल्हास्तरीय विविध योजनांची सदर संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरीता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये. यासाठी तयार केलेली प्रतिक्षायादी पुढील 5 वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे.
यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल,हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरीता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.
या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशींचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1000 मासंल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रीया सन 2021-22 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे. त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक / शेतकरी बांधव, सुशिक्षीत बेरोजगार युवक / युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सन. एम. नरळे व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. ए. सोनवणे यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट
ॲड्रॉईड मोबाईल ॲप्लिकेशनचे नांव AH-MAHABMS (गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध) या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचा कालावधी – 04 /12/21 ते 18/12/21 असून टोल फ्री क्रमांक -1962 किंवा 1800-233-0418 असा आहे. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरीता स्वत:चे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा.
अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील टोल फ्री क्रमांकावर किंवा आपल्या तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी, पंयायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची सिताफळ संशोधन केंद्रला भेट
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथील विद्यार्थ्यांच्या कृषि संशोधन केंद्रांना भेटी