मौजे पन्हाळवाडी ता. भूम हे गाव सह्याद्री रांगांच्या बालाघाट डोंगराच्या कुशीत वसलेले हे एक छोटेसे गाव. या गावात जाण्यासाठी साधा रस्ता पण नीटनेटका नाही. येथे इयत्ता १ली ते ४ थी पर्यंत वर्ग आहेत. परंतु या शाळेत कार्यरत असणारे सहशिक्षिका वनिता कोकाटे मॅडम व सहशिक्षक माधव पोतरे सर यांनी सावित्रीबाई फुले यांचे जयंतीचे औचित्य साधून दिनांक ३ जानेवारी २०२५ रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रक्तदान व आरोग्य शिबीराची सुरुवात माँसाहेब जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन गटशिक्षणाधिकारी श्री भट्टीसाहेब यांच्या हस्ते करुन नवीन उपक्रम राबविण्यात आला.
पण नुसता देखावाच नाही तर कृतीतून नवीन उपक्रमच नाही उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्याचे कार्य हे दोघे करत आहेत. येथील विद्यार्थी जिल्ह्यातील, विविध स्पर्धांपरिक्षांमध्ये सहभागी होऊन प्रथम येण्याचा मान मिळवितात. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार जि.प.प्रा.शा. पन्हाळवाडी ता. भूम जि.धाराशिव या शाळेने तालुकास्तरीय तिसरा क्रमांक पटकावला आहे. या सहशिक्षकांनी
पटसंख्येची कमतरता असताना व कोणत्याही प्रकारच्या पुरेशा सोयीसुविधा नसताना देखील विद्यार्थी संख्या २४ पटावरून ४२पटावर नेली शिक्षकांनी मनात आणत कारणे न सांगता माँसाहेब जिजाऊ, ज्योतिबा फुले,सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज इत्यादी विचारवंत यांच्या विचारांने प्रभावित होऊन शाळेमध्ये विविध उपक्रम राबवून आदर्श विद्यार्थी कसे घडतील याकडे जातीने लक्ष देतात व आदर्श शाळा बनविण्यासाठी कार्य करतात. त्यांनी शाळेमध्ये वृक्षारोपण व परसबाग फुलवली आहे. दोन्ही शिक्षक उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्याचे कार्य करत करत आहेत.
शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने पन्हाळवाडी शाळा एक आदर्श शाळा म्हणून नावारूपास आली आहे. रक्तदानात गावातील नागरिकांनी, सुकटा केंद्रातील व तालुक्यातील शिक्षकांनी, सहभाग नोंदविला तर आरोग्य शिबीरामध्ये बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला. रक्त संकलन सह्याद्री ब्लड बँक धाराशिव ने केले. त्यावेळी वरिष्ठ अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी पर्यवक्षिका,पन्हाळवडी, बावी, पाथरूड येथील ग्रामस्थ, तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
उपळकर यांना जोतिबा सावित्री गुणवंत पुरस्कार प्रदान
दत्त प्राथमिक शाळेस उपक्रमशील शाळा पुरस्कार
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून श्री सिद्धेश्वर महायात्रा 2025 च्या कामांचा आढावा