ग्राहक व्यवहार विभागाने कांद्याच्या प्राथमिक प्रक्रिया, साठवण आणि मूल्यमापनासाठी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी GrandOnionChallenge सुरू केले आहे.
ग्रँड ओनियन चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह कांद्याच्या स्टोरेज आणि व्हॅलॉरायझेशनमध्ये प्रगती करणाऱ्या स्टार्टअप्सना बोलावणे. ग्राहक व्यवहार विभाग (DoCA), ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय (MoCAFPD) ने ‘ग्रँड चॅलेंज ऑन ओनियन स्टोरेज’ द्वारे ‘कांद्याच्या प्राथमिक प्रक्रिया, साठवण आणि मूल्यमापनासाठी तंत्रज्ञान’ विकसित करण्याची घोषणा केली.
येथे करा अर्ज https://doca.gov.in/goc/
कांदा हे तसं पाहायला गेलं तर एक महत्वाचे उत्पादन. चांगले उत्पादन आल्यानंतर सगळेच उत्पादन एकाच वेळी बाजारात विकता येईल असे नाही. मग अशावेळी महत्वाचे ठरते ते नियोजन.
नियोजन कांद्याची साठवणूक करण्याचे.
कांद्याची साठवणूक करण्याचे तंत्र नेमके काय आहे? हे जाणून घेऊया.
शेतीमधील प्रत्येक उत्पादन कसे साठवावे याचे शास्त्र वेगवेगळे आहे. कांद्याच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास कांदा म्हणजे एक जिवंत वस्तू म्हणता येईल. कारण काढणी झाल्यानंतरही कांद्याचे श्वसन सुरु असते. कांद्यातून पाण्याचे उत्सर्जन होत असते यामुळे योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जर, असे केले नाही तर नुकसान अधिक होण्याची शक्यता असते. यामध्ये, कांद्याला कोंब येणे, कांदा सडणे, वजन कमी होणे इत्यादी नुकसान होण्याची शक्यता असते.
यामुळेच, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कांद्याची शास्त्रोक्त पद्धतीने साठवण करणे अपरिहार्य आहे. असे केल्याने कांद्याचे होणारे नुकसान रोखणे शक्य नसले तरी कमी करणे शक्य आहे. कांद्याची साठवणूक करण्यासाठी महत्वाची पद्धत म्हणजे कांदा चाळ बनविणे. जर कांदा चाळ शास्त्रोक्त पद्धतीने उभारली गेली तर कांदा ४ ते ५ महिन्यापर्यंत सुस्थितीत राहू शकतो. आणि याचा निश्चित फायदा शेतकऱ्यांना आर्थिक रुपात मिळू शकतो.
कांदा साठवणूक स्ट्रक्चरचा प्रत्येक भागात वेग वेगळ्या नावाने उल्लेख केला जातो, जसा की नाशिक जिल्ह्यात कांदा चाळ , नगर जिल्ह्यात कांदा भुसार , जुन्नर परिसरात कांदा बराखी, सातारा भागात कांदा वखार मध्य प्रदेश मध्ये प्याज भंडार किंवा गोदाम. जशी नावात विविधता तशीच त्याचे स्वरूप ही वेग वेगळे आढळते. शेतकऱ्यांनीही आप आपल्या परीने वेग वेगळे प्रयोग केलेले असतात, जसे की पाचरट छप्पर म्हणून वापरणे, मध्येच सछिद्र पाइप टाळणे, चाळीच्या वर लाईट बसवणे, चाळीला आतून तू वापरणे. मध्या प्रदेश मध्ये तर exhaust fan चा वापर करण्याची विलक्षणच वेगळी पद्धत बघायला मिळते.
परंतु या सर्व storage structures चे standard स्वरूप कसे असावे जेणेकरून नुकसान पातळी आपण कमी करू शकू ? यासाठी विचार मंथन होण्यासाठी केंद्र सरकार ने एक स्पर्धा आयोजित केली आहे. यात विद्यार्थी व नवीन स्टार्टअप आवाहन स्वीकारू शकतात. सदर स्पर्धेचे नाव Grand Onion Challenge असून, सदरील स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी लिंक जारी झाली आहे. अधिक माहिती साठी खालील लिंक वर अधिकची माहिती मिळू शकते.
https://www.mygov.in/task%2Fonion-grand-challenge-registration-open
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद