21 डिसेंबर व 22 डिसेंबर रोजी मालवण येथे आयोजित सागरी जलतरण स्पर्धेत फ्लिपर्स स्विम क्लब बार्शीच्या 15 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत 500 मीटर आणि सर्वात लांब 10 किलोमीटर अशा विविध इव्हेंट्समध्ये विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. विविध वयोगटांनुसार हे इव्हेंट्स आयोजित करण्यात आले होते.

स्पर्धेतील प्रमुख यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
- शिवराज बारबोले (500 मीटर स्पेशल ग्रुप – 7वा)
- तेजस्विनी ताकभाते (वय – 8, 1 किलोमीटर – 7वा)
- तनवी नवले (वय – 9, 1 किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण)
- स्निग्धा जगताप (वय – 9, 1 किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण)
- आयुष जाधव (वय – 9, 1 किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण)
- शौर्य नवले (वय – 10, 1 किलोमीटर – 6वा)
- धैर्यशील ताकभाते (वय – 9, 1 किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण)
- रणवीर सातपुते (वय – 15, 10 किलोमीटर – 9 वा, 3 किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण)
- जयसिंह शिंदे (वय – 14, 3 किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण)
- रुद्र नवले (वय – 14, 3 किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण)
- आर्यन दुधाळ (वय – 14, 3 किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण)
- त्रिवेदीका बारबोले (वय – 14, 3 किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण)
- गायत्री ठवरे (वय – 15, 3 किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण)
- माधव शिंदे (वय – 14, 10 किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण)
- स्वराज्य डोईफोडे (वय – 14, 10 किलोमीटर यशस्वीरित्या पूर्ण)
या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले ते सुंदर लोमटे सर, आहारतज्ञ करुणा शिंदे, डॉक्टर युवराज रेवडकर, आणि प्रशिक्षक बाळराजे पिंगळे सर यांचे. त्यांचे मार्गदर्शन आणि मेहनत यामुळे विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत यश मिळवले.

More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी