ग्रेट वर्क कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत जगदाळे मामा हॉस्पिटलच्या सेंट्रल आय. सी. यु. ॲण्ड ट्रॉमा सेंटर युनिटला सौंदरे गावचे उपसरपंच उद्योगपती मा. राजेंद्रभाऊ सुरवसे यांनी १ लाख रुपये देणगीचा धनादेश संस्थेकडे सुपूर्त केला.
बार्शी तालुक्यातील सौंदरे येथील राजेंद्रभाऊ सुरवसे यांनी महाराष्ट्र विद्यालय व श्री शिवाजी महाविद्यालय याठिकाणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. याचीच जाणिव ठेवत ते कोणतेही अपेक्षा न ठेवता मदतीला धावून येणार व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आज पुणे अणि बार्शी याठिकाणी सुरवसे यांचे अनेक उद्योग असून राजकारणात देखील एक धाडशी व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जातात.
१ लाख रुपये देणगीचा हा धनादेश संस्थेकडे सुपूर्त करताना मा. डॉ. सचिन ओंबासे (जिल्हाधिकारी धाराशिव), मा. डॉ. लक्ष्मीकांत दामा ( प्र.कुलगुरु सोलापूर विद्यापीठ) मा. श्री. देवानंद चिलवंत ( सोलापूर विद्यापीठाचे व्य. प. सदस्य ) संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष श्री. नंदनजी जगदाळे, सचिव श्री. पी. टि. पाटील, खजिनदार श्री. बापूसाहेब शितोळे, सह सचिव श्री. अरुण देबडवार इ. मान्यवर उपस्थित होते.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!