सोलापूरची कन्या किर्ती भराडिया हिने विश्वविक्रम नोंदवित
कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
सोलापूरची सागरकन्या असलेली किर्ती नंदकिशोर भराडिया, सोलापूर (वय 18) हिने श्रीलंका ते भारत हे 32 किलोमिटर चे अंतर समुद्रात न थांबता 10 तास 25 मिनिट पोहून पूर्ण केले.

या ऐतिहासिक क्षणाला वर्ल्ड रेकॉर्ड कम्यूनिटीचे उच्च अधिकारी उपस्थित होते. त्यांनी कीर्तीला विश्वा विक्रमाचे प्रोविजनल प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. याबद्दल तिचे सर्व स्तरांवर कौतुक होत आहे.
तिच्या या कामगिरीबद्दल मनपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा.
More Stories
नागपूर व महाराष्ट्राची कन्या बुद्धिबळपटू दिव्या देशमुख यांना जागतिक विजेतेपद ‘ग्रँड मास्टर’ हा किताब
कलाशिक्षक संघटनेतर्फे शिक्षण मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर
जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award