Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय “ आदर्श मुख्याध्यापक ” पुरस्कार सौ. उज्ज्वला व्हनाळे यांना

मुख्याध्यापक संघाच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय “ आदर्श मुख्याध्यापक ” पुरस्कार सौ. उज्ज्वला व्हनाळे यांना

सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने दरवर्षी जिल्हास्तरीय “ आदर्श मुख्याध्यापक " पुरस्कार देण्यात येतो. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीच्या पुरस्कारासाठी मुख्याध्यापक सौ उज्वला दत्तात्रय व्हनाळे हि. ने. शहा कन्या प्रशाला, बार्शी ता बार्शी यांची निवड करण्यात आली
मित्राला शेअर करा

याबद्दल त्यांचे मुख्याध्यापक संघाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले व सपत्नीक सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापक सौ. उज्ज्वला व्हनाळे यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी, गुणवत्तावाढीसाठी व शाळेला नावारूपाला आणण्यासाठी राबविलेले विविध उपक्रम यामुळेच त्यांना ‘ आदर्श मुख्याध्यापक ‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे .

या वर्षीचे पुरस्कार वितरण मा. श्री दत्तात्रय भरणे ( मामा ) पालक मंत्री सोलापूर जिल्हा व मा. श्री औदुंबर उकीरडे शिक्षण उपसंचालक पूणे विभाग पूणे यांच्या शुभहस्ते मा. श्री जयंत आसगावकर शिक्षक आमदार पुणे विभाग यांच्या अध्यक्षतेखाली व मा श्री भास्करराव बावर शिक्षणाधिकारी माध्यमिक सोलापूर डॉ. किरण लोहार शिक्षणाधिकारी प्राथमिक सोलापूर सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री. तानाजी रामचंद्र माने सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ अध्यक्ष श्री. तानाजी रामचंद्र माने, संघाचे सचिव बापू आत्माराम नीळ, श्री. सुभाष माने माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि. २७ मार्च २०२२ रोजी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्या सपत्नीक व स्टाफ व हितचिंतक याच्यासोबत उपस्थित होत्या. कोविड नियमांचे पालन करून हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.