Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > “हेल्थ क्लब” च्या निरोगी विचारातून साकारला “एक मोठा सामाजिक उपक्रम”……!

“हेल्थ क्लब” च्या निरोगी विचारातून साकारला “एक मोठा सामाजिक उपक्रम”……!

"हेल्थ क्लब" च्या निरोगी विचारातून साकारला "एक मोठा सामाजिक उपक्रम"……!
मित्राला शेअर करा

फ्रेंइस बहुउद्देशीय संस्था व रणरागिणी महिला बहुउद्देशीय संस्था,बार्शी संचलित ” हेल्थ क्लब-बार्शी” ने जोपासली एक फार मोठी सामाजिक बांधिलकी. श्रीदत्त वारकरी सेवाभावी संस्था-अंंतर्गत आश्रयातील ४५ मुले त्यातील २५ मुले पुर्ण अनाथ असणाऱ्या आश्रमास एक महिना पुरेल असे अन्नधान्य व दैनंदिन लागणाऱ्या सर्व वस्तूंचे मनोभावे वाटप करण्यात आले.

 याप्रसंगी सुरूवातीला कार्यक्रम प्रास्ताविक श्री.भगवान लोकरे-सर यांनी केले. हेल्थ क्लब ने केलेले चौफेर कार्य आढावा श्री.संतोष घावटे-सर यांनी मांडला ; "कार्याला चांगल्या कर्माची जोड मिळाली की माणसाचे आयुष्य सत्कारणी लागते"-याबाबत विचार मांडले. शैक्षणिक-पर्यावरण-वृक्षसंवर्धन-शिक्षण-आरोग्य-सामाजिक अशा हेल्थ क्लब ने केलेल्या कार्याचा आढावा श्री.संभाजी नवले-सर यांनी मांडून देणगीदार मान्यवरांचे आभार मानले.

याप्रसंगी उपस्थित मा.श्री.तानाजी पाटील सो|-(व्यावसायिक-नाशिक), श्री.अनिल भोसले सो|-(व्यावसायिक-बार्शी), समाजसेवक विजयकुमार दिवाणजी सर श्री.राहूल वाणी सो|-(समाजसेवक), श्री.सुमित खुरूंगुळे सो|-(समाजसेवक), श्री.लहू मोहिते सो| मित्रमंडळ,बार्शी, श्री.उदयकुमार शिंदे सो|-अध्यक्ष:उडान फाऊंडेशन(श्री करियर अकॅडमी-बार्शी) यांनी प्रेरणादायी विचार मांडून मोठ्या देणगी रक्कमा संबंधित संस्थेचे कार्यवाह श्री.सागर(महाराज) कोल्हाळे यांच्याकडे सपुर्त केल्या. हेल्थ क्लब चे मार्गदर्शक श्री.किरण तौर-सर यांनी ही आपले प्रेरणादायी विचार मांडले.

हेल्थ क्लब ने चालू वर्षी जिल्हास्तरीय वक्तृत्व-चित्रकला-सामान्य ज्ञान स्पर्धा, कोजागिरी पौर्णिमेला १०००+ ली.दूध वाटप व आषाढी एकादशीला फराळाची सामुग्री वाटप, छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज जयंतीनिमित्त विविध क्रिडा स्पर्धांचे आयोजन, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त भव्य बाईक रैली असे बरेच सामाजिक उपक्रम राबवले.

श्री दत्त वारकरी सेवाभावी संस्था,ताडसौदने रोड-बार्शी यांनी हेल्थ क्लब ने केलेल्या मदतीबाबत-देणगी बाबत सर्वांचे मनोभावे ऋण व्यक्त केले.

या सामाजिक बांधिलकी ! उपक्रमासाठी सर्व हेल्थ क्लब टीमने विशेष परिश्रम घेतले; व अनेकांनी अन्नदान करणेबाबत मनोदय व्यक्त केला.