महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेले ‘ अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र ‘ हे मासिक गेली 30 वर्षे नियमितपणे प्रकाशित होत आहे अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या आजवरच्या या जडणघडणीत बार्शीतील हेमंत शिंदे यांचा सहभाग मोठा आहे, या वार्तापत्राची वाचक संख्या वाढविण्यासाठी हेमंत शिंदे नेहमी प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणारे मासिक म्हणून आज ते सुप्रसिद्ध आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हे मासिक महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणारे मासिक म्हणून प्रसिद्ध आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा साठी विविध विषयांवर लेख लिहून तसेच वाचक वर्ग वृद्धिंगत करून शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचविण्याचे महत्त्वाचे कार्य हेमंत शिंदे करत आहेत. या कार्याची दखल घेऊन त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा ‘ आधारस्तंभ ‘ हा पुरस्कार जाहीर करीत करण्यात आला असून हा पुरस्कार सुप्रसिद्ध पत्रकार अलका धूपकर व जेष्ठ नाट्यकर्मी सुषमा देशपांडे या मान्यवरांच्या हस्ते वितरीत केला जाणार आहे.

हा पुरस्कार सोहळा दोन दिवस असून पहिल्या दिवशी शनिवार दि . ८ जानेवारी रोजी वार्तापत्राचे शतकवीर, आधारस्तंभ पुरस्कारप्राप्त कार्यकर्ते, लेखक, संपादक मंडळ यांचा संवाद मेळावा आयोजित केला असून पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रविवार दि. ९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ११ वाजता पुस्तकांचे गाव भिलार, ता. महाबळेश्वर येथे संपन्न होणार आहे.
More Stories
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते तृत्तीयपंथी देवांशी काकडेच्या आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन
कलाशिक्षक संघटनेतर्फे शिक्षण मंत्र्यांना मागण्यांचे निवेदन सादर