वैराग प्रतिनिधी – जाकीर तांबोळी
दि २९ सप्टेंबर- हिंगणी धरण परिसरामध्ये गेल्या आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने हिंगणी मध्यम प्रकल्प सलग दुसऱ्या वर्षांही भरुन वाहत आहे.त्यामुळे वैराग नगर पंचायतीसह आठ गावाच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न मिटल्याने वैराग नगरपंचायतच्या मुख्याधिकारी वीणा पवार यांच्या हस्ते जलपूजन तसेच पंप हाऊस येथे वृक्षारोपणहीकरण्यात आले.
या प्रसंगी कार्यालयीन अधीक्षक सुवर्णा हाके, रामभाऊ जाधव,विलास मस्के,दत्ता मस्के,अमजद शेख,किरण वाघमारे,सचिन पानबूडे,सुदाम खेदांड, आण्णासाहेब जगताप, बाळासाहेब पांढरमिसे, रफिक शेख,स्वप्नील चौधरी,चंद्रकांत साळवे, संगीता तोडकरी,फय्याज शेख,अशोक मोरे,इसाक शेख,प्रसाद भेंडे.अशोक पोळ,दिनकर काशीद आदी उपस्थित होते.
हिंगणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने वैराग, हिंगणी, पिंपरी,मळेगाव,लाडोळे घाणेगाव, उपळे जामगाव नांदनी,लाडोळे,हळदुगे, मानेगाव काळेगाव,तडवळे, इर्ले,इर्लेवाडी येथील शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
दोन वर्षे तरी वैराग शहराला पाणी कमी पडणार नाही असा विश्वास वैरागच्या मुख्याधिकारी वीणा पवार यांनी व्यक्त केला
More Stories
व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुलदीप जंगम साहेब यांचे जिल्हा स्तरीय किशोरी मेळाव्यात विविध विषयांवर हितगुज
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमांतर्गत महाविद्यालयांचा उर्त्स्फुत प्रतिसाद