बार्शी – तुळजापूर मार्गावरील बावी हद्दीतील पुरातन व रस्त्यावरील दुर्लक्षित कळवत्नीचा महलाची धर्मरक्षक प्रतिष्ठान व बावीतील ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता करण्यात आली. महाशिवरात्री दिवशी वास्तूची स्वच्छता व शिवलिंगास दूध, जल अभिषेक करून पूजाअर्चा करण्यात आली.

तुळजापूर मार्गावरील बावी हद्दीतील पुरातन व रस्त्यावरील दुर्लक्षित कळवत्नीचा महलाची धर्मरक्षक प्रतिष्ठान व बावीतील ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता करण्यात आली.
महाशिवरात्रीचे औचित्य साधून येथील तरुणांच्या वतीने तसेच धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने मंदिराच्या आवारात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तरूणांनी महालात जाऊन तेथे स्वच्छता केली. महादेवाच्या पिंडीवर साठलेली धुळ झटकुन घेत पाण्याने धुऊन घेऊन पिंडीवर दुग्धाभिषेक केला. विधिवत पूजा अर्चा करूण पुष्पहार अर्पण केला.
News by गणेश गोडसे, बार्शी
More Stories
मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार, गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय
‘महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धे’चे अर्ज सादर करण्यास आज शेवट मुदत
कर्मवीर विद्यालय चारे येथे चित्रकला मार्गदर्शन शिबिर