Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान

व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान

व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान
मित्राला शेअर करा

बार्शी : ६ जानेवारी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमात पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी शहर चे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, तालुकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, व्हॉईस ऑफ मीडियाचे राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, डिजीटल विंगचे प्रदेशअध्यक्ष हर्षद लोहार, राज्यसचिव इर्शाद शेख, वैद्यकिय अधिकारी शितल बोपलकर, ज्येष्ठ पत्रकार एन.आर.कुलकर्णी, अरुण बळप, बा.न.पा.चे माजी मुख्याध्याकारी बप्पा पाटील, साप्ताहिक विंगचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अमोल आजबे, शहर अध्यक्ष शाम थोरात, तालुका अध्यक्ष अस्लम काझी हे व्यासपीठावर उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार श्रीमती वैजयंती शंकर भिसे, रमेश रामराव गायकवाड, प्रशांत काळे, संजय बोकफोडे, आनंद डुरे यांना सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

सन्मानित पत्रकारांनी आपल्या भाषणातून पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांचा व महत्त्वाचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी तरुण पत्रकारांना मार्गदर्शन करताना सत्य आणि निर्भीड पत्रकारितेचा आग्रह धरला.

सूत्रसंचालन साप्ताहिक विंगचे पश्चिम महाराष्ट्र संघटक संदीप आलाट यांनी केले तर आभार शहर सचिव निलेश झिंगाडे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी व्हॉईस ऑफ मीडिया बार्शीचे विजय शिंगाडे, मयुर थोरात, ओंकार हिंगमिरे, समाधान चव्हान, प्रदिप माळी, मल्लिकार्जुन धारूरकर, प्रविण पावले, जमीर कुरेशी, उमेश काळे, कु.अपर्णा दळवी, गोविंद भिसे, विक्रांत पवार, भूषण देवकर, श्रीशैल्य माळी, सौ.संगीता पवार, सौ.सुवर्णा शिवपुरे, स्वप्निल पवार, निलेश उबाळे, सुशेन डमरे, राहुल भालशंकर, राहुल गुरव, मुजम्मिल कौठाळकर, सागर गरड, संजय बोकेफोडे, संतोष राजगुरू, आसिफ मुलानी, अजीम शेख, गणेश अडसूळ यांनी परिश्रम घेतले.

बार्शी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली. पत्रकारितेचा हा सन्मान नव्या पिढीला प्रेरणा देईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.