Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > सोलापूर/उस्मानाबाद > आई तुळजाभवानी मातेची अभिषेक पूजा सुरू !

आई तुळजाभवानी मातेची अभिषेक पूजा सुरू !

आई तुळजाभवानी मातेची अभिषेक पूजा सुरू !
मित्राला शेअर करा

कोरोना निर्बंधा पासून बंद असलेली महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आई तुळजाभवानी मातेची अभिषेक पूजा मंगळवार, दिनांक २४ मे पासून सुरू करण्यात आली आहे. दिनांक २३ मे रोजी पुजारी शिष्टमंडळाने मंदिर व्यवस्थेतील अडचणी व समस्या मांडल्या होत्या. शिष्टमंडळामध्ये तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री.सज्जनराव साळुंके, उपाध्यक्ष श्री.विपिन शिंदे, श्री.आप्पासाहेब पाटील, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष श्री.अनंत कोंडू, प्राध्यापक श्री.धनंजय लोंढे, श्री.सुधीर कदम यांच्यासह पुजारी बांधवांचा समावेश होता.

अभिषेक पूजा सुरू करणे, धार्मिक व्यवस्थापक बदलणे, पुजाऱ्यांना बायोमेट्रिक ओळखपत्र देणे यासह इतर महत्त्वपूर्ण मागण्या पुजारी मंडळाकडून मांडण्यात आल्या. माजी नगराध्यक्ष श्री.सचिन रोचकरी यांचा देखील याबाबत सातत्याने पाठपुरावा होता. यातील अभिषेक पूजेची मागणी प्राधान्याने घेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली व त्वरित त्याअनुषंगाने सर्क्युलेटेड (चक्रमुद्रांकित) ठराव घेऊन दि.२४ मे पासून सकाळी ६:०० ते ९:०० या वेळेत अभिषेक पूजा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आई तुळजाभवानी मातेच्या भक्तांसाठी ही अतिशय आनंददायी बाब असून पुजारी मंडळाच्या इतर मागण्यांबाबत देखील सकारात्मक निर्णय घेण्याचे शिष्टमंडळाला आश्वासित केले.

याविषयी बोलताना आमदार राणाजगजितसिंह पाटील म्हणाले छत्रपती संभाजी राजे यांच्या बाबतीत घडलेला प्रकार अनपेक्षित होता. याबाबत चौकशी व कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच आमदार पाटील यांनी छत्रपती संभाजी राजेंशी चर्चा करून दिलगिरी व्यक्त केली. याच्या नंतर छत्रपती संभाजी राजे जेंव्हा कधी तुळजापूर दर्शनासाठी येतील त्यावेळी सन्मानपूर्वक देवीच्या गाभार्‍यात प्रवेश दिला जाईल अश्या सुचना संबंधितांना दिल्या.