तेर प्रतिनिधी :- हरी खोटे – पाल्याचे कौतुक हे नेहमी प्रत्येकाला असते त्याच्या कलागुणांच्या प्रदर्शनाने मन भरून जाते व शाळेप्रती असणारी सहानुभूती जागृत होते हेच दिसून आले धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथील आयडियल इंग्लिश स्कूलमधील वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त चिमुकल्यांनी विविध प्रकारच्या देशभक्तीपर लोकगीते, लावणी, बाल गीतांवर विविध प्रकारच्या कलाविष्काराचे उत्कृष्ट रित्या सादरीकरण केल्याने आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी पालकांसह गावकरी भारावले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्कार भारती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल देशमुख, मेष्टचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरडे, गौडगावचे सरपंच बालाजी भोसले, हिंगळजवाडीचे सरपंच सुरेश नाईकनवरे, सेवानिवृत्त एपीआय नामदेव जाधव, संजय ढवळे, अश्विन देशमुख, बालिका देशमुख, पूजा जाधव, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या वैशाली आडसूळ यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना पालकांसह ग्रामस्थांकडून भरभरून दाद मिळाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर लोकगीते, लावणी, बालगीते सादर केली हे स्नेहसंमेलन प्राचार्य वैशाली आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली मीनाक्षी लोमटे, उमा कोथिंबीरे, राजकन्या नाडे, ज्ञानदा घुटुकडे, भाग्यश्री खोडवे, सारीका मुळे, शुभांगी घेवारे, नंदिनी शिंदे यांनी यशस्वी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानदा घुटुकडे यांनी केले तर आभार शुभांगी घेवारे यांनी मानले.
More Stories
भाजप शहराध्यक्षपदी दुसऱ्यांदा महावीर कदम, तालुक्यात 3 निवडी जाहीर
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन संघटनेच्या 80 व्या स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.मुबंईच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विभागीय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन