Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > महाराष्ट्र > सीईटी परीक्षा संदर्भात महत्वाची माहिती

सीईटी परीक्षा संदर्भात महत्वाची माहिती

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी पात्रता परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
मित्राला शेअर करा

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी पात्रता परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर झाले आहे.

खालील वेबसाईटवर क्लिक करून सर्व अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा संदर्भात सविस्तर माहिती घ्या

https://cetcell.mahacet.org/

प्रवेशासाठी सीईटी अनिवार्य आहे. या परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
मे महिन्यात या सीईटी परीक्षा होणार आहेत. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे या परीक्षा विस्कळीत झाल्या होत्या आता कोरोना संसर्ग कमी झाल्याने यंदा सीईटी परीक्षा वेळेत होतील, अशी शक्यता आहे. त्यासाठीची अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. सीईटी सेलतर्फे विविध अभ्यासक्रमांसाठीचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. एप्रिलमध्ये अर्ज प्रक्रिया होऊन मे आणि जून महिन्यात टप्प्याटप्प्याने सीईटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

एलएलबी ३ वर्षांसाठी १२ एप्रिलपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून ७ व ८ जूनला परीक्षा होतील. एलएलबी ५ वर्षांसाठी ७ पर्यंत अर्ज भरता येईल, १७ व १८ मे रोजी परीक्षा होईल. बीए, बीएड व बीएस्सीसाठी ७ एप्रिल पर्यंत अर्ज सादर करता येईल.