बार्शी – : लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनीचया वतीनेआयोजित नवचेतना मैत्री फेस्टिव्हलचे दिमाखदार उद्घाटन डिस्ट्रीक गवर्नर एमजेएफ ला . ॲlएम के पाटिल तसेच वूमन एम्पॉवरमेंट डिस्ट्रिक्ट चेअरमन MJF ला. चेतना होमकर व लायन्सबार्शी टाऊन चे अध्यक्ष ला. महावीर कदम यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले .
या क्लबच्या माध्यमातून बचपन ते पचपन जी कन्सेप्ट राबवली आहे. त्याचबरोबर बार्शीतालुक्यातील महिलांसाठी व्यासपीठ उपलब्ध होत आहे. महिलांच्या छोट्या कलागुणांना वाव मिळत आहे असे कौतुक MJF ला. चेतना होमकर यांनी केले व फेस्टीवल साठी शुभेच्छा दिल्या.
महिलांमध्ये सुप्त गुण असतात व या गुणांना वाव मिळाल्यास त्या आपल्या जीवनाचे सार्थक करू शकतात त्यासाठी बार्शीतील लायन्स क्लब बार्शी टाउन तेजस्विनी या क्लब ने नवचेतना मैत्री फेस्टिवल आयोजित केले आहे असे प्रकल्प प्रमुख ला . शर्वरी फुरडे म्हणाल्या .
हे मैत्री फेस्टिव्हल २१ व २२ सप्टेंबर रोजी लिंगायत बोर्डिंग येथे दोन दिवस होत आहे. यामध्ये कलश डेकोरेशन , सोलो व ग्रुप डान्स , पणती डेकोरेशन , वडिलांच्या वाढदिवसानिमित्त ग्रीटिंग कार्ड बनवणे , तसेच आगळीवेगळी स्पर्धा म्हणून लहान बाळाचे रांगणे , हेल्दी स्माईल स्पर्धा व सासु सुनांमध्ये तूतू – मेमे स्पर्धा अशा विविध १५ स्पर्धा होणार आहेत विविध प्रकारचे शॉपिंग स्टॉल व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असणार आहेत.
हा कार्यक्रम मुली व महिलांसाठी सकाळी ११ ते रात्री १० पर्यंत सुरू आहे .सर्व बार्शीकर महिलांनी याचा आनंद घ्यावा असे आव्हान अध्यक्ष विद्या काळे व तेजस्विनी सदस्यांनी केले आहे.
या उद्घाटनासाठी डिस्ट्रीक सीओ. ला. गंगाप्रसाद बंडेवार , चिपळून येथील ला. संतोष होमकर , लिओ अध्यक्ष गौरव देढिया लायन्स क्लब बार्शी टाऊन , तेजस्विनी व लिओ टाऊन चे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
या कार्यासाठी लायन्स तेजस्वीनी चे अध्यक्ष ला विद्या काळे , सचिवा ला प्राची जमदाडे , खजिनदार ला कविता अंधारे , ला शर्वरी फुरडे , ला योगीता कटारीया , ला वैशाली शहा , ला पल्लवी बजाज यांनी परिश्रम घेतले आहे
सूत्रसंचालन जयश्री ढगे व सोनाली कसपटे यांनी केले .प्राची जमदाडे यांनी आभार प्रदर्शनाने केली.
More Stories
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!
बार्शी येथे मनशक्ती प्रयोग केंद्राची आरोग्यप्राप्ती, रोगमुक्ती कार्यशाळा संपन्न