बार्शी : साहित्य सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र व फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ, अमर शेख विचार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. सहाव्या समतावादी साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शक कॉम्रेड तानाजी ठोंबरे, संमेलनाच्या संयोजन समितीचे अध्यक्ष जयकुमार शितोळे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. हेमंत शिंदे उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. यादव म्हणाले, बार्शी मध्ये समतावादी साहित्य संमेलन होत असल्याने कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही. विशेष म्हणजे संमेलनानिमित्त येणाऱ्या साहित्यिक, श्रोत्यांना व प्रेक्षकांनाही मोफत वैद्यकीय सेवा देण्यासाठी बार्शीतील वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवणार असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी संयोजन समिती अध्यक्ष जयकुमार शितोळे यांनीही आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यस्मरणादिवशी या कार्यालयाचे उद्घाटन होत असल्याने संमेलन निश्चितच यशस्वी होईल, अशी आशा व्यक्त केली. कार्यक्रमात कॉम्रेड तानाजी ठोंबरे, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, स्मरणिका समितीचे उमेश पवार यांनीही विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास यावेळी कवी शब्बीर मुलानी, नाट्य चळवळीचे सतीश होनराव, कार्याध्यक्ष संदीप अलाट, उपाध्यक्ष वसीम पठाण, सुप्रिया गुंड पाटील, गणेश गोडसे, विजयश्री पाटील, अमोल आंधळकर, कॉम्रेड डॉ. प्रवीण मस्तूद, दलित महासंघाचे निलेश खुडे, वसीम मुलानी, शोएब सय्यद, अकिब पठाण, सतीश झोंबाडे, अमृत अलाट, उपस्थित होते. सूत्रसंचालन अमोल आंधळकर यांनी केले तर आभार सुनील आवघडे यांनी मानले.
More Stories
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी ‘मित्र’ संस्थेचे बहुपर्यायी उपक्रम उजनी पर्यटन केंद्र, आयटी पार्क, डाळिंब क्लस्टर, शेंगाचटणी ब्रँडला चालना देण्यावर भर
इक्विटास स्मॉल फायनान्स बँक बार्शी शाखेच्या वतीने महाराष्ट्र विद्यालयात गणेश उत्सवानिमित्ताने रंगभरण स्पर्धा संपन्न
शासनाकडून जिल्हा नियोजनासाठी २२ हजार कोटी; ग्रामपंचायतींनी निधीचा सुयोग्य वापर करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार