पंचायत समिती बार्शी. व सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल बार्शी. यांच्या व संयुक्त विद्यमाने ४९ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाट्न श्री अनिल बनसोडे साहेब प्रशासन अधिकारी बार्शी नगरपरिषद शिक्षण मंडळ यांच्या हस्ते थोर भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम व सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी बार्शी नगरपरिषद शिक्षण मंडळ पर्यवेक्षक श्री संजय पाटील सर आणि सिल्व्हर ज्युबिली हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री प्रशांत कोल्हे सर, प्रताप दराडे समन्वयक, विज्ञान प्रदर्शन. उत्तरेश्वर शिराळ विज्ञान विषयतज्ञ. श्री प्रकाश पावले सर विज्ञान विभाग प्रमुख सिल्व्हर ज्युबिली आदी उपस्थित होते.
सर्वांचे हायस्कूलच्या वतीने स्वागत करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक, माध्यमिक, व शिक्षक आणि प्रयोग शाळा सहाय्यक यासर्वांचे मिळून 275 पेक्षा जास्त विज्ञान साहित्य घेऊन 700 विद्यार्थी शिक्षक सहभागी झाले असून विज्ञान प्रदर्शनास बार्शी शहर व तालुक्यातील शाळेतील विद्यार्थी पाहणार आहेत.
उत्कृष्ट विज्ञान प्रदर्शन मांडणीसाठी वर्गाखोली नियोजन, NCC विद्यार्थ्यांच्या मदतीने शिस्तबद्ध पाहणी नियोजन, करण्यात आले असून यासाठी शाळेतील सर्वच विज्ञान शिक्षक सेवक आदिनी परिश्रम घेतले.
More Stories
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान
असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या नवीन नोंदणीसाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी ठेवून काम करावे- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप