बार्शी:- हाय – परफॉर्मन्स क्रिकेट अकॅडमी, बार्शी व वर्तमान हेल्थ केअर (हिरेमठ हॉस्पिटल) ( अमित इंगोले व सुमित प्रकाश जैन) यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सोजर मूकबधिर शाळा, खांडवी येथील १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप करण्यात आले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोजर कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. सुजित करपे सर, सोजर मूकबधिर शाळेचे भोसले सर होते. या वेळी जगदाळे सर, सचिन आवटे सर, पंकज मुळे, तसेच सोजर आय.टी.आयचे प्राचार्य कारंडे सर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या यशस्वी भविष्यासाठी प्रोत्साहन दिले.
सामाजिक बांधिलकीतून प्रेरणा:
हाय-परफॉर्मन्स क्रिकेट अकॅडमीचे डायरेक्टर अमित इंगोले व सुमित प्रकाश जैन यांनी क्रीडाक्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना उभारी देण्यासाठी या उपक्रमाची संकल्पना मांडली. विद्यार्थ्यांनी, मुलांनी जास्तीत जास्त खेळाकडे लक्ष द्यावे, तसेच आपल्या शरीराकडे ही लक्ष द्यावे, खेळाडूंना उत्तम क्रीडा सुविधा व संधी मिळाव्यात, यासाठी त्यांनी आपली बांधिलकी व्यक्त केली.
हा उपक्रम ग्रामीण भागातील क्रीडा संस्कृती वाढवण्यासाठी प्रेरणादायी ठरत असून, १७ खेळाडूंना दिलेला हा पाठिंबा त्यांना स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी निश्चितच प्रेरणा देईल.
More Stories
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड
सेंट जोसेफ स्कूल बार्शीच्या ध्रुव पाटील याची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
श्री. शिवाजी महाविद्यालयाचे मैदानी स्पर्धेत घवघवीत यश