26 जुलै म्हणजे आजपासून पॅरिस ऑलिंपिक ची सुरूवात होत आहे. यापूर्वी, 2008 बीजिंग ऑलिंपिक्स मध्ये गोल्ड जिंकणारा भारतीय खेळाडू अभिनव बिंद्रा Paris 2024 Torch Relay Event मध्ये सहभागी झाला होता आणि ऑलिंपिक टॉर्च हातात धरली होती.
या सन्मानानंतर, ऑलिंपिक मध्ये वैयक्तिक गोल्ड जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू आणि माजी नेमबाज (Shooter) बिंद्राने सोशल मीडिया पोस्ट द्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
पॅरिस 2024 Relay मध्ये ऑलिंपिक मशाल हातात घेणे हा माझ्यासाठी एक शब्दांपलीकडचा सन्मान होता.”
भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आणखी एक अभिमानाची बाब म्हणजे इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटी ने अभिनव बिंद्राला ऑलिंपिक Movement मधील अतुलनीय योगदानाबद्दल ‘ऑलिंपिक ऑर्डर देऊन सन्मानित केले आहे. ऑलिंपिक च्या समारोपाच्या एक दिवस आधी 10 ऑगस्ट रोजी Paris मध्ये 142 व्या IOC सत्रादरम्यान हा पुरस्कार सोहळा होणार आहे.
ऑलिंपिक ऑर्डर पुरस्कार हा एखाद्या व्यक्तीला दिला जाणारा सर्वोच्च ऑलिंपिक सन्मान आहे!
More Stories
ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन, १७ खेळाडूंना शूज जोड्यांचे वाटप
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या पाच खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड
सेंट जोसेफ स्कूल बार्शीच्या ध्रुव पाटील याची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड