बार्शी:- धर्मरक्षक प्रतिष्ठान व स्वराज्य संघटनेच्या च्या सदस्यांनी श्रावण सोमवार चे अवचित साधून बार्शी तुळजापूर रोड वरील दुर्लक्षित असलेल्या ऐतिहासिक वास्तू ची स्वछता व त्या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाला महाअभिषेक करुन मंदिराचा जर्णोधार करण्यात केला.
बार्शी तुळजापूर रोड वरील शेलगाव व बावी जवळ असलेले ऐतिहासिक वास्तू अनेक वर्षा पासुन ही दिमाखात उभे आहे, या पुरातन मंदिराचे जतन व संवर्धन आपण जालेच पाहिजे, शिवकाळातील ही वास्तू असून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूना निवारा, व पाणी विश्रांती मिळावी या साठीच हे बाधले असावे, स्थानिक नागरिकांनी या मंदिराची नित्य नेमाने पूजा करायला चालू करावी, शेलगाव व बावी गावातील ग्रामपंचायतीने या वास्तू कडे लक्ष देण्याची गरज आहे.
धर्मरक्षक प्रतिष्ठान प्रमुख व स्वराज्य संघटना बार्शी शहर युवक प्रमुख गणेश रावळ यांच्या मार्गदर्शना खाली ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत स्वराज बार्शी शहर सरचटणीस शाम डीसले, गौरव भंडारे, हरिष हाके, शेखर पाटील, गणेश गायकवाड, रोहित इगले, अशोक आगलावे, विशाल विटे आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.
टिप :- अश्या वास्तु , पुरातन मंदिरे , अजुन कोठे असतील तर आम्हाला कळवा आम्ही सर्व दुर्गसेवक आपल्या गावात येऊन त्या ठिकाणी स्वछता मोहीम राबवून त्या वास्तू चे आपण जंतन व संवर्धन करू, तसेच शिवभक्तांनी व शिवप्रेमिनी आशा मोहिमेत येण्याचा प्रयत्न करत चला असे आवाहन करण्यात आले आहे .
जय शिवराय हर हर महादेव ..
गणेश रावळ
8999896048
More Stories
संवर्धन समिती बार्शी, गौरी गणपती पर्यावरण संवर्धन सजावट स्पर्धा 2024
प्रिसिजन वाचन अभियानगुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी!
महाराष्ट्र विद्यालयाची विद्यार्थ्यांनी मानसी सुहास काळे हिची जे. जे. स्कूल ऑफ आर्ट मुंबई येथे निवड