मुदती संपणाऱ्या व नवनिर्मित नगरपरिषदांच्या निवडणुकांकरिता प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप तयार करण्या बाबतचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकारी ( मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून ) यांना दिले आहेत.
राज्यातील यापूर्वी मुदत समाप्त झालेल्या व माहे डिसेंबर , 2021 ते फेब्रुवारी , 2022 या कालावधीत मुदत समाप्त होणाऱ्या अ , ब व क वर्गातील नगरपरिषदांची कच्ची प्रभाग रचना शासनाच्या दि .01 ऑक्टोबर , 2021 च्या अध्यादेशातील तरतुदीनुसार ( बहुसदस्यीय प्रभाग पध्दती नुसार ) तयार करुन ठेवण्याबाबत सदर कार्यालयांना कळविण्यात आले होते .

राज्य शासनाने अध्यादेश काढून ” अ ” वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे . तसेच ” अ ” वर्ग नगरपरिषदेमध्ये किमान सदस्य संख्या 40 असेल आणि 75 पेक्षा अधिक नसेल , ” ब ” वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 2 ने वाढ केली आहे . ” ब ” वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 25 असेल आणि 37 पेक्षा अधिक नसेल . ” क ” वर्ग नगरपरिषदेसाठी निवडून आलेल्या परिषद सदस्यांच्या संख्येमध्ये 3 ने वाढ केली आहे . ” क ” वर्ग नगरपरिषदेसाठी किमान सदस्य संख्या 20 असेल आणि 25 पेक्षा अधिक नसेल .
या अध्यादेशातील तरतुदीनुसार वरील प्रमाणे नमूद केल्यानुसार सदस्य संख्या निश्चित करुन त्यानुसार कच्ची प्रभाग रचना कोणत्याही परिस्थीत दि .30 / 11 / 2021पूर्वी तयार करुन ठेवावी व त्याबाबत आयोगास आवगत करण्यात यावे असे आदेश. मा.राज्य निवडणूक आयुक्त यांनी संबंधित जिल्हा प्रशासन अधिकारी व नगरपरिषदांचे चे मुख्याधिकारी यांना
दिले आहेत.
More Stories
गुन्हा सिद्ध करण्यासाठी ‘लॅब ऑन व्हील’, महाराष्ट्र हे देशातील मोबाईल फॉरेन्सीक व्हॅन सुरू करणारे पहिले राज्य
कै. सुभाष गणपत काळे यांच्या स्मरणार्थ सचिन वायकुळे यांना यावर्षीचा सामाजिक गौरव पुरस्कार जाहीर
दिव्यांगांसाठी महामंडळाची ‘शॉप ऑन ई- व्हेईकल योजना’, 10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन