नाशिक, दि. २७ एप्रिल – महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघाच्या वतीने आज शालेय शिक्षण मंत्री माननीय श्री. दादाजी भुसे यांना कलाशिक्षकांच्या विविध समस्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले.

या प्रसंगी महासंघाचे राज्याध्यक्ष माननीय प्रल्हाद साळुंखे सर यांनी कलाशिक्षकांवरील अन्यायकारक धोरणे व त्यातून उद्भवणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर माहिती मंत्र्यांसमोर मांडली. निवेदनात मुख्यत्वे कलाशिक्षकांच्या पदभरतीसाठी कार्यवाही करण्यात यावी, संच मान्यतेमध्ये स्वतंत्र कलाशिक्षक पद दाखवावे, शिक्षक भरतीसाठी असलेली ५०० विद्यार्थ्यांची अट रद्द करावी, पवित्र पोर्टलमध्ये कलाशिक्षकांचा समावेश करण्यात यावा व रिक्त कलाशिक्षकांच्या जागांवर फक्त कला विषयातील शिक्षकांचीच नेमणूक करण्यात यावी, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.
संस्थाचालकांना ठरावाद्वारे कलाशिक्षक पद भरती करण्यास मान्यता देण्यात यावी, अशीही आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. अन्य विषय शिक्षकांना कलाशिक्षकांच्या रिक्त जागांवर नेमण्याच्या प्रकरणाला संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे.
या निवेदन सादरीकरण प्रसंगी महासंघाचे राज्य सदस्य श्री. दत्तात्रय सांगळे सर, विभागीय अध्यक्ष श्री. चंद्रशेखर सावंत सर, नाशिक जिल्हाध्यक्ष श्री. राजेंद्र लोखंडे सर, व्हिजन नाशिक विभागीय संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. सचिन पगार सर, उपाध्यक्ष श्री. योगेश रोकडे सर, उपाध्यक्ष श्री. संजय बोरसे सर, सत्य काम बिडकर सर, चंद्रकांत वाघ सर, प्रशांत सावंत सर, सागर बच्छाव सर, सागर पवार सर, सुवर्णा पगार मॅडम तसेच नेरकर सर, गवळी सर, सूर्यवंशी सर व चौधरी सर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनेच्या या मागण्यांवर मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले असल्याचे समजते.
More Stories
बार्शीपुत्र सुजित मुंढेंच्या ‘पोलीस प्रशासन व नागरिक सेवा’ पुस्तकाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन
महाराष्ट्र विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या इयत्ता पाचवी मधील विद्यार्थ्यांच्या पालकांची शिक्षक-पालक सभा उत्साहात संपन्न
जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award