प्रसन्नने एका वर्षात तीनही आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त केले
बार्शी येथील महाराष्ट्र विद्यालयाचा विद्यार्थी प्रसन्न जगदाळे यास रॅपिड नंतर ब्लीट्स मध्ये आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त झाले.

पुणे येथे झालेल्या ऑल इंडिया ओपन ब्लीट्स तीन मिनिट दोन सेकंद इन्क्रिमेंट असलेल्या अती जलद चेस टूर्नामेंट मध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, दिल्ली या राज्यातून खेळाडू आले होते. आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त असलेल्या या स्पर्धेत ३०३ खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पराभूत करून प्रसन्न जगदाळे यांनी गुणांकन प्राप्त केले.
आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त १९५८ असलेले डोंगरे चंद्रकांत यांना प्रसन्नने बरोबरीत रोखले तर मिलिंद सुर्वे, निखिल देशपांडे, आर्णव व राऊत, आरुष यांना पराभूत करून आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त केले.
या यशाबद्दल शिवशक्ती बँकेचे व्हाईस चेअरमन अशोक जगदाळे व संचालक हनुमंत चव्हाण यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक चव्हाण, शिक्षक नलगे, ऊपळकर, अनिल पाटील, यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक