बार्शी, दि. १३ – यंदाच्या वर्षी ३० व ३१ जानेवारी २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर येथे आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी परिषद होत आहे. या परिषदेत बार्शीचे तृतीयपंथी मार्गदर्शक सचिन वायकुळे यांना मार्गदर्शन करण्यासाठी पत्राद्वारे विद्यापीठाचे निमंत्रण मिळाले असून तृतीयपंथी व सामाजिक बदल यावर ते या परिषदेत बोलणार आहेत.

एकविसाव्या शतकात तृतीयपंथीयांचे जगणे, जगतिकस्तरावरील त्यांची प्रगती, दर्जा तसेच आरोग्य आणि संस्कृतिक स्वीकृती, समानता यावर ही जागतिक परिषद होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी परिषदेत तृतीयपंथी यांचे हक्क संरक्षण, मनसिक, शारीरिक आरोग्य तसेच रोजगार निर्मिती आशा विविध विषयांवर चिंतन, मंथन होणार आहे.
या परिषदेसाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे अध्यक्ष डॉ. गौतम कांबळे, सचिव डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी याचे उत्तम नियोजन केले आहे. याचबरोबर समन्वयक डॉ. ए. एल. भास्के, टी. एल. तांबोळी तसेच डॉ. तेजस्विनी कांबळे यांच्यासह वृत्तपत्रविद्या विभाग व इतर यासाठी परिश्रम घेत आहेत.
More Stories
आई, संत, भगवंत ही तीन माणसे सोडली तर या जगात सगळी माणस स्वार्थी आहेत ह.भ.प. इंदोरीकर महाराज
कुस्ती स्पर्धेत अगळगाव येथील लोकसेवा विद्यालयाचे चार विद्यार्थी जिल्हा स्तरावर
बार्शीच्या शहाजी फुरडेंचा व्हिएतनाममध्ये सन्मान, विमा व्यवसायातील MDRT चा विशेष बहुमान