Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > व्हिडीओ > इर्लेवाडीत दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट,वादळी वाऱ्याचा फटका; लाखो रुपयांचे नुकसान

इर्लेवाडीत दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट,वादळी वाऱ्याचा फटका; लाखो रुपयांचे नुकसान

इर्लेवाडी (वैराग ) शरद सरकाळे व अमोल सरकाळे बंधूंची दोन एकरावरील द्राक्षबाग शुक्रवारी आलेल्या वाऱ्याने भुईसपाट झाली. सरकाळे यांची द्राक्ष आठ दिवसात विक्रीसाठी बाजारात येणार होती अचानक द्राक्षबाग भुईसपाट झाल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मित्राला शेअर करा

बार्शी तालुक्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे शुक्रवारी अचानक संध्याकाळी जोरदार वारा सुटला. यामध्ये इर्लेवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी शरद सरकाळे व अमोल सरकाळे यांची दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट झाली द्राक्ष बागेचे वादळी वाऱ्यात फौंडेशन ताण तुटल्याने बागेसाठी केलेले फाऊंडेशन वाकले. जमिनीवर घडांचे व द्राक्ष मण्यांचे अंथरून पडले


भालचंद्र सरकाळे , शरद सरकाळे अमोल सरकाळे यांनी लाखो रुपये खर्च करून पिकविलेले द्राक्ष भुईसपाट झाले आहेत. दोन एकर द्राक्ष द्राक्ष बागेत 50 टन उत्पादन निघेल असा अंदाज होता.


कृषी सहायक, गावकामगार तलाठ्यांना झालेल्या नुकसानीबाबत उपसरपंच पंकज सरकाळे यांनी माहिती दिली. तत्काळ पंचनामा करून मदत मिळवून द्यावी मागणी शेतकरी शरद सरकाळे द्राक्षबागेचे नुकसान झालेले समजताच खा. ओमराजे निंबाळकर यांनी त्वरित पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

पदरी शेवटी निराशाच
द्राक्ष शेती म्हणजे पीकाचे पैसे हात येईपर्यंत अस्मानी संकट व सुलतानी संकटाला तोंड देत पोटच्या प्रमाणे द्राक्ष बाग जपलेली असते शेतकर्‍यांच्या मानत पीक विक्री होऊन पैसे हातात पडेपर्यंत चिंता असते यात कीटकनाशकांचे व खतांचे वाढलेले दर, वाढलेली मजुरी, मिळणारा कमी भावा व वाढता उत्पादन खर्च, पाणी टंचाई, खंडित वीजपुरवठा, अतिवृष्टी आणि शेवटी पीक विक्री नंतर सुद्धा काहीवेळा व्यापारी पैसे लवकर देण्यास टाळाटाळ करतात किंवा पैसे न देता पळून जातात असे प्रकार ही काहीवेळा घडले आहेत. व्यापाऱ्यांच्या बाबतीत घडणार्‍या व्यापाऱ्यांवर सुद्धा शासनाने काहीतरी अंकुश ठेवणे गरजेचे आहे बहुतांशी व्यापारी परप्रांतीय किंवा पर जिल्ह्यातील असतात व त्यांची कोठेही काहीही नोंद नसते यावर कृषी खात्याने उपाययोजना करणे आवश्यक आहे किमान व्यापाऱ्यांची नोंदणी करून परवाने देण्यात यावे जेणेकरून फसवणुकीचे प्रकार, पैसे बुडवण्याचे प्रकार घडणार नाहीत.

https://bit.ly/3t76NwH