Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > “जाहला कौतुके सोहळा “

“जाहला कौतुके सोहळा “

"जाहला कौतुके सोहळा "
मित्राला शेअर करा

दि.16/09/23..श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित किसान कामगार विद्यालय उपळाई (ठोंगे) येथे गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळा- 2023 चे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे खजिनदार आदरणीय जयकुमार शितोळे व प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय गणपतराव गरड (IFS)हे लाभले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकण्यासाठी उपळाईकर ग्रामस्थ, शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.

विडिओ

सन 2022 -23 च्या एसएससी बोर्ड परीक्षेत विद्यालयात प्रथम, द्वितीय तृतीय आलेल्या तसेच सन 2021- 22 व 2022 -23 च्या आठवी स्कॉलरशिप NMMS परीक्षेत शिष्यवृत्तीधारक झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले. रोख रक्कम रु. 22000/- बक्षिसांच्या रकमेचे गुणवंत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

उपळाई ठोंगे येथील जि .प. प्रा. शाळा क्र.1 चे श्री. काकासाहेब यावलकर यांना रोटरी पुरस्कार व जि .प .प्रा. शाळा क्र.2चे श्री.आनंद घाडगे जि. प. स्कॉलरशिप शिक्षक पुरस्कार तसेच कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक पुरस्काराचे मानकरी श्री. महेश कुंभारे शं. नि. अ.वि. बार्शी व प्रशालेतील सह शिक्षिका श्रीमती संगीता गायकवाड यांचा प्रशालेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. कष्ट व जिद्दीच्या जोरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यश मिळवता येते हे मा. गरड साहेबांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.

बक्षीस दात्यांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक, प्रशालेतील शिक्षक, माजी सरपंच, माजी विद्यार्थी शिक्षण प्रेमी नागरिक यांचे वतीने सदर पारितोषिके देण्यात आली. आपल्या अध्यक्षीय मनोगतात श्री. शितोळे (बापू) यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि ग्रामस्थांनी विविध पारितोषिके देऊन यांना शाबासकी आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले.

सर्व विद्यार्थ्यांनी पुढील करिअर साठी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या प्रशालेचे आणि गावाचे नाव करावे असे आवाहन केले.

या कार्यक्रमासाठी किसान कामगार विद्यालय उपळाई चे स्कूल कमिटी चेअरमन डॉ. सर्जेराव माने आणि सदस्य व संस्थेचे ट्रस्टी डॉ.चंद्रकांत मोरे यांच्यासह श्री.सुरेश मोरे श्री. अंबॠषी लोकरे. श्री. विजय ठोंगे, श्री.संदीप बोटे, श्री. जयवंत कदम श्री. प्रशांत जामदार, जामदार आबा जामदार काका, सोमनाथ वैद्य, अनिल काळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक मधुकर शेळके यांनी केले. पाहुण्यांचा परिचय हनुमंत चव्हाण यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विजया माने व श्रीमती संगीता गायकवाड यांनी केले. आभार सतीश गवळी यांनी व्यक्त केले.