मनोजजरांगे पाटील यांच्या गरजवंत मराठ्याच्या आरक्षणासंदर्भातील लढ्याला आरक्षण बचाव यात्रा काढून उघड उघड विरोध केल्यामुळे पुण्याच्या वसंत मोरे नंतर बार्शीचे भाऊसाहेब आंधळकर यांनी व्यथित होऊन वंचित बहुजन आघाडीचा नुकताच राजीनामा दिला आहे.
तसेच भाऊसाहेब आंधळकर यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच जरांगे पाटील यांचा तुळजापूर दौरा असताना माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी तथा बार्शीचे नेते भाऊसाहेब आंधळकर व सौंदरे गावचे उपसरपंच, मराठा उद्योजक राजाभाऊ सुरवसे यांच्यासह इतर सहकाऱ्यांना घेऊन आंधळकर यांनी जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली व त्यांचा सन्मान सत्कार केला.
त्यांच्या भेटीदरम्यान आणि चर्चेदरम्यान तर्क वितर्क लावले जात आहेत यासंदर्भात भाऊसाहेब आंधळकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी ‘वेट अँड वॉच’ अशी प्रतिक्रिया दिली. या बाबत बार्शी तालुक्यात चर्चेला उधाण आले असून विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब आंधळकर यांच्या पुढील भूमिका काय असेल याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे आहे.
More Stories
राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत छत्रपती बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या 11 खेळाडूंचे उज्ज्वल यश
प्रा. राहुल पालके यांना सोलापूर विद्यापीठाकडून विद्यावाचस्पती ( पी.एच.डी.) प्रदान
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सूचना: केवायसी प्रक्रिया तातडीने करा!