जवाहर नवोदय विद्यालय सोलापूर पेस सेटिंग उपक्रमांतर्गत अंतर्गत पेंटींग कॉम्पिटिशन आझादी का अमृत महोत्सव आणि पेस सेटिंग उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा 2021-22 पार पडल्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ 19 फेब्रुवारी दिवशी संपन्न झाला.
स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी काढलेली सर्व चित्रे अप्रतिम आणि सुंदर होती या मध्ये 50 विद्यार्थ्यांनी आकर्षक पारितोषिके आणि बक्षिसे जिंकली आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथील प्रणव प्रकाश आवारे या इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांने जिल्हास्तरीय प्राथम क्रमांक प्राप्त केला.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील जवळपास २५ जास्त शाळांचे जवळजवळ १५० विद्यार्थी सहभागी झाले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर, मोहोळ येथील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
प्राथम क्रमांक विजेता प्रणव आवारे या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण जी.ए. जेष्ठ शिक्षक श्री. सपताळे आर. बी. तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
More Stories
राज्यात १५ ऑक्टोबर रोजी साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
धाराशिव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ समिती प्रमुखांनी दिले प्रशिक्षण
बार्शी बसस्थानक व आगाराच्या पुनर्बांधणीसाठी १४ कोटी ९९ लाख ५० हजार मंजूर :- आमदार राजेंद्र राऊत