Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award

जिजाऊ गुरुकुल खांडवीला राज्यस्तरीय The Best School Award

डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे मुंबई येथे पार पडलेल्या मेस्टा राज्यस्तरीय अधिवेशनात सन्मान
मित्राला शेअर करा

खांडवी, ता. बार्शी:- जिजाऊ गुरुकुल खांडवी या शैक्षणिक संस्थेने आपले शैक्षणिक व सर्वांगीण कार्यकौशल सिद्ध करत “The Best School Award” मिळवून एक मानाचा टप्पा गाठला आहे. ठाणे, मुंबई येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडलेल्या मेस्टा राज्यस्तरीय अधिवेशनात शाळेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी मेस्टा चे प्रदेश अध्यक्ष डॉ नामदेव दळवी,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे मेस्टा चे संस्थापक अध्यक्ष, संजय तायडे पाटील यांच्या उपस्थित पार पडला.

सदर पुरस्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संभाजी घाडगे सर यांच्या हस्ते स्वीकारण्यात आला. हा सन्मान मिळाल्यामुळे संपूर्ण जिजाऊ गुरुकुल परिवारात आनंदाचे वातावरण असून, विद्यार्थ्यांमध्ये व शिक्षकवृंदामध्ये उत्साहाचे नवीन पर्व सुरू झाले आहे.

ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कार व आधुनिक तंत्रज्ञानाचा समतोल साधत घडवणाऱ्या जिजाऊ गुरुकुलच्या कार्याची ही योग्य दखल असून, यामुळे भविष्यात आणखी प्रेरणादायी उपक्रम राबविण्यास बळ मिळणार आहे.