Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत जिंकले पदक

स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत जिंकले पदक

मित्राला शेअर करा

अभिनेता आर. माधवनचा R Madhavan मुलगा वेदांतने Vedaant पुन्हा एकदा अभिमानास्पद कामगिरी केली आहे. नुकतंच बेंगळुरूमध्ये पार पडलेल्या ४७व्या ज्युनिअर नॅशनल ॲक्वेटिक चॅम्पियनशिपमध्ये त्याने सातवं पदक जिंकलं आहे.

वेदांतने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये ४ रौप्य आणि ३ कांस्य पदक जिंकले आहेत. त्याच्या या यशावर नेटकऱ्यांकडून भरभरून कौतुक होत आहे. ‘रहना है तेरे दिल मे’ या चित्रपटातील माधवनची सहकलाकार अभिनेत्री दिया मिर्झानेही वेदांतला शुभेच्छा दिल्या आहेत. स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं.

ऑगस्ट महिन्यात वेदांतचा १६ वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. मुलाच्या वाढदिवसानिमित्त माधवनने सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली होती. ‘ज्या ज्या बाबींमध्ये मी उत्कृष्ट आहे, त्या सर्वांमध्ये माझ्या पुढे जाण्यासाठी धन्यवाद. तुझ्यामुळे माझा उर अभिमानाने भरून येतो. तुझ्याकडून मला खूप काही शिकायला मिळतंय. मी खूप नशिबवान पिता आहे’, असं त्याने लिहिलं होतं. वेदांत सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चेत असून ‘आदर्श मुलगा’ म्हणून त्याचं कौतुक करण्यात येत आहे.