पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कौशल्य विकास अभ्यासक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पत्रकारिता प्रमाणपत्र अभ्यासक्रमात अनिल बनसोडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे.

नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी म्हणून सध्या बनसोडे कार्यरत आहेत. यामध्ये निलेश बोकेफोडे द्वितीय तर सौरभ बचुटे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे.
येथील राजर्षी शाहू विधी महाविद्यालयात हा अभ्यासक्रम चालवला जात आहे. यावर्षीच्या अभ्यासक्रमाचा निकाल ७० टक्के इतका लागला आहे. सर्व यशस्वी विद्याथ्यांचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. डी. गाढवे, समन्वयक ए. बी. गवळी, सचिन वायकुळे तसेच बापू गलांडे यांनी कौतुक केले आहे.
More Stories
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
धाराशिवला भव्य बसपोर्ट उभारण्यासाठी कार्यवाही करा -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक