पत्रकार दिनाचे औचित्य साधून शनिवारी येथील श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, व महाराष्ट्र विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शीतील सर्व पत्रकारांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार नाना गव्हाणे, प्रेस क्लबचे अध्यक्ष अजित कुंकूलोळ व प्रिंट मीडिया,डिजिटल मीडियाच्या सर्व पत्रकार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
‘नवराष्ट्र’ चे पत्रकार उमेश पवार यांच्यासह अजित कुंकूलोळ, नाना गव्हाणे, शहाजी फुरडे, गणेश गोडसे, सचिन अपसिंगकर ,संतोष सुर्यवंशी, विजय निलाखे,संजय बारबोले, नितीन भोसले, चंद्रकांत करडे,गणेश भोळे, मल्लिकार्जुन धारूरकर,अजय पाटील, गणेश घोलप, कादीर बागवान,अरूण बळप, दत्ता सुरवसे, दिनेश मेटकरी, विनोद ननवरे,महादेव वाघ, बालाजी विधाते या सर्व पत्रकारांचा व सोलापूरचे क्रीडा अधिकारी सुनील धारुरकर यांचाही सत्कार संस्थेचे सचिव पी.टी पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
यावेळी सचिन अपसिंगकर, नाना गव्हाणे, अजित कुंकूलोळ यांनी विचार व्यक्त केले. पत्रकारांनी महाराष्ट्र विद्यालय शाळेशी असणारे ऋणानुबंध सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला यात शाळेचे माजी शिक्षक तसेच जेष्ठ पत्रकार भ.के. गव्हाणे (नाना) यांनी आपली पत्रकारितेची सुरुवात कशी झाली या बद्दलच्या आठवणींना उजाळा दिला, अजित कुंकूलोळ यांनीही याच परिसरात शिक्षण घेत असतानाचे काही आठवणी सांगितल्या
संस्थेचे सचिव पी.टी. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना संस्थेतील कामाचा आढावा थोडक्यात घेतला तसेच शाळेमध्ये राबवण्यात येत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञान शिक्षण पद्धती याविषयी माहिती दिली कार्यक्रमात महाराष्ट्र विद्यालयातील सहशिक्षक आनंद कसबे यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारती ,पुणे यांच्या भूगोल स्वाध्यायपुस्तिका समीक्षण समितीवर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सोबत विद्यालयाचे प्राचार्य जी.ए. चव्हाण उपप्राचार्य एल.डी.काळे, जेष्ठ शिक्षक सपताळे सर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा.किरण गाढवे यांनी तर आभार प्रदर्शन के.जी.मदने यांनी केले.
More Stories
नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
वृक्ष संवर्धन समिती बार्शी च्या “वृक्ष संवर्धन दिनदर्शिका २०२५” चा प्रकाशन सोहळा संपन्न
उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस हवालदार अमृत खेडकर यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यावतीने सत्कार व सन्मान