राज्यात पत्रकारीतेमध्ये उल्लेखनीय कार्य करणा-यांना एजेएफसीच्या वतीने सन्मानित केले जाते.गोडसे यांनी पंचवीस वर्ष केलेल्या पत्रकारीतेमधील कार्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले.
संघटनेमध्ये खुप मोठी ताकद असते.समाजाला जागृत करण्यासाठी आज अणेकजन काम करतात.पत्रकारिता 24 तास करण्याची प्रक्रिया आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पद्मभूषण देशपांडे यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.यावेळी व्यासपीठावर राज्याचे सांस्कृतिक व साहित्य समिती सदस्य प्रा.एल.बी.पाटील,एजेएफसीचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल, सचिव बाळकृष्ण कासार, मुंबईचे अध्यक्ष निसार अली सय्यद ,कांचन जांबोटी, श्रीधर क्षिरसागर,सत्यवान विचारे,इरशाद शेख, सचिन ठोंबरे
आदी मान्यवर उपस्थित होते.

एजेएफसीचे यासीन पटेल यांनी प्रास्ताविकात पत्रकाराच्या हक्कासाठी संघटना कशी गरजेची आहे याबाबत माहिती देऊन यापुढेही पत्रकाराच्या प्रश्नांवर एजेएफसी कार्यरत राहील असे सांगितले.
प्रा.एल बी पाटील बोलताना म्हणाले की पत्रकारांचे अस्तित्व विकत चालले आहे.अलिकडील काळात असंख्य पत्रकारांचे जिव घेतले गेले.तसेच अणेक पत्रकार आजही जेलमध्ये आहेत. आमच्या वेदणा मांडणारी पत्रकारिता आवश्यक आहे.राजकारण्यांची धुणी धुणारी पत्रकारिता धोक्याची आहे.
देशपांडे पुढे बोलताना म्हणाले की संघटनेसाठी खुप वेळ द्यावा लागतो.पत्रकारितेसमोर कालही आव्हाने होती, आजही व उद्याही आव्हाने असतील.समाजाच्या सेन्सॉरशिपला आवाहण देत काम करणे हेही मोठे आव्हान आहे.टोकदार अस्मिता असणारे समाज घटक आज समाजात दबाव गट जास्त असतात.ते दडपण झुगारून काम करणे पत्रकारांची जबाबदारी असते.पत्रकार समाजाचे पहारेकरी असतात. समाजातील सर्व घटकांचे प्रश्न एक नागरिक म्हणून पत्रकारांचेही असतात.समाजातील कर्त्याची भुमिका पत्रकारांना बजवावी लागते.पत्रकारांनी दबावगट निर्माण करूण पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम करावे.अनिल जासकरे यांनी सुत्रसंचालन केले.
यांचा झाला सन्मान;-
राहुल कुलट(अकोट,अकोला),अभिमन्यू लोंढे(सावंतवाडी,सिंधुदुर्ग),गणेश गोडसे(बार्शी, सोलापूर),अतुल होनकळसे(कराड,सातारा),युयुत्सु आर्ते(संगमेश्वर, रत्नागिरी),गणेश कोळी(पनवेल,रायगड)
आजपर्यंत पत्रकार गणेश गोडसे यांना अणेक पुरस्कार प्राप्त झाले असुन त्यामधील काही पुरस्कार असे: –
1) विजय प्रताप युवा मंच बार्शी तालुका. प्रा.साहेबराव देशमुख-2012-13
2) भ्रष्टाचार निर्मुलन जन संघटना,महाराष्ट्र राज्य यांचा राज्य स्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार -2015
3) ‘पांगरीत मुलीच्या जन्माचे वाजत गाजत स्वागत ‘ या दै.पुढारीत प्रकाशित झालेल्या वृत्ताची दखल घेऊन ग्रामविकास व महिला बालविकास खात्याच्या मंत्री पंकजाताई मुंढे यांनी पत्र पाठवुन विशेष अभिनंदन केले होते-2015
4)माळशिरस तालुका पत्रकार, संघाकडुण गौरव-2016
5) राजमाता प्रतिष्ठाण,महाराष्ट्र राज्य यांचा राज्यस्तरीय
राजमाता आदर्श पत्रकारीता पुरस्कार -2016
6) अक्कलकोट ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने सन्मानित-2016
7) राजयोग व व्यसनमुक्ती केंद्राच्या वतीने पत्रकारितेमधील योगदानाबद्दल सन्मानीत-2017
8) नक्षत्रांचे देणं काव्यमंचच्या वतीने आदर्श पत्रकार पुरस्कारांने सन्मानित-2017
9) पिंपरी(सा) येथे स्थानिक विविध मंडळे व ग्रामस्थांच्या वतीने जिल्हा अधिकारी रमेश घोलप यांच्या हस्ते सन्मानीत-2017
10)सोलापूर जिल्हा रहिवाशी संघटना,महाराष्ट्र राज्य
आदर्श पत्रकारिता पुरस्कार-2018-19
11) कोविड योद्धा पुरस्कार-2019
12)पत्रकारीता बार्शी आयकाॅन पुरस्कार-2019
13)वृत्तपत्र विक्रेता संघटनेचा गुणगौरव पुरस्कार-2020
14) राज्यस्तरीय दलित मित्र आदर्श पत्रकार गौरव पुरस्कार-2021
15) डाॅ. कुन्ताताई नारायण जगदाळे जीवनगौरव पुरस्कार-2022,आदी ईतर अणेक पुरस्कार
16) भारत विकास परिषदेचा सेवा पुरस्कार – 2022
More Stories
महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकाराच्या कीर्तनसेवेचा मुळेवाडीनगरीत घुमणार गजर
प्रशिक वाघमारे यांची नवोदय प्रवेश परीक्षेत यश
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले