Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > क्रीडा > के. एन. भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज भोसरे येथे जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा

के. एन. भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज भोसरे येथे जागतिक सायकल दिन उत्साहात साजरा

मित्राला शेअर करा

के. एन. भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज, विद्यानगर, भोसरे या महाविद्यालयामघ्ये जागतिक सायकल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व स्वयंसेवक, स्वयंसेवका स्वतःची सायकल घेऊन मोठ्या संख्येने रॅलीला उपस्थित होते. या रॅलीला संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार माननीय विनायकरावजी पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून सकाळी नऊ वाजता सायकल रॅली मार्गस्थ केली.

महाविद्यालयापासून चिंचगाव येथील महादेव टेकडी पर्यंत या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नेहरू युवा केंद्र, सोलापूर, सनराईज फाऊंडेशन, सोनके, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आय. क्यू. एस. सी. यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

याप्रसंगी माजी आमदार विनायकरावजी पाटील म्हणाले प्रदूषण रोखायचे असेल तर जगातील प्रत्येक व्यक्तीने सायकल वापरणे गरजेचे आहे. प्र. प्राचार्य डॉ. पी. एस. कांबळे म्हणाले पेट्रोल, डिझेल या खनिज तेलांचा तुटवडा भासणार आहे. तेव्हा आपण सायकली सारखी वाहने वापरणे गरजेचे आहे. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्राध्यापीका व प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. अतुल कदम उपस्थित होते.