के एन भिसे आर्ट्स, कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज विद्यानगर भोसरे, या महाविद्यालया मध्ये मंगळवार दिनांक २६ ऑक्टोंबर २०२१ रोजी कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड या लसीकरणाचे शिबिर संपन्न झाले.

या शिबिरासाठी रोपळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे सूर्यवंशी सिस्टर व तेथील सर्व स्टाफ उपस्थित होता. या शिबिरामध्ये महाविद्यालयातील एकूण ३० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यामध्ये दुसरा डोस घेणारे ७ लाभार्थी व पहिला डोस घेणारे २३ लाभार्थी ठरले. या शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या आ.क्यू.ए.सी., राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते.
शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर. आर. पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.याप्रसंगी आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. डॉ. सचिन लोंढे राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. अतुल कदम सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक उपस्थित होते.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल