कै.नागेश रामलिंग गाडवे आणि कै.ओंकार रामलिंग नरके यांच्या स्मरणार्थ आझाद गणेश मंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात १५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

या रक्तदान शिबिरास माजी मंत्री दिलीपरावजी सोपल तसेच उद्योजक महेश यादव यांनी भेट दिली. रक्तदान शिबिराचे उद्घाटन नगरसेवक मंडळाचे आधारस्तंभ नगरसेवक पृथ्वीराज राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वंभर नरके रामलिंग गाढवे आदिनाथ गायकवाड सोमनाथ गाढवे, डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे अध्यक्ष टिंकू पाटील, जेष्ठ पत्रकार भ. के गव्हाणे (नाना), अप्पासाहेब पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी लखन राजपूत कुणाल नरके रोहित गलांडे अभिजीत कारंडे सोनल शिराळ करण राजपूत राज सदावर्ते सुदर्शन शिराळ अभिजीत खुडे ओंकार डिकोळे सागर शिराळ सुरज गायकवाड अक्षय बरिदे अक्षय कवडे ऋषिकेश सावंत व इतरानी परिश्रम घेतले.
More Stories
शाकंभरी नवरात्रोत्सवात आकाशात अवतरली भवानी माता; ३०० ड्रोनने साकारला भक्तीचा अद्भुत सोहळा
नव्या वर्षात महिलांसाठी कौशल्यपूर्ण संवाद सक्षमीकरणावर भर देणार – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
लाडोळे मार्गे वैराग ते उपळे रस्त्याची अवस्था दयनीय; ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल