बार्शी:- कै. सुभाष गणपत काळे यांच्या स्मरणार्थ कुलदैवत फार्म यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावर्षीचा सामाजिक गौरव पुरस्कार दैनिक संचारचे सहसंपादक सचिन वायकुळे यांना दिला जाणार आहे.

सचिन वायकुळे हे एक प्रख्यात पत्रकार असून त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या कार्याद्वारे समाजातील महत्त्वाच्या विषयांना वाचा फोडली आहे. त्यांच्या लेखणीने समाजाच्या विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे आणि त्यांचा कार्यशिल्प समाजासाठी प्रेरणादायक ठरला आहे.
४४ तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क मिळवून देणारे पत्रकार सचिनजी वायकुळे यांनी तृतीयपंथी समुदायासाठी केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार जाहीर सचिन वायकुळे हे मागील १५ वर्षांपासून देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी तसेच ८ वर्षांपासून तृतीयपंथी समुदायासाठी समर्पितपणे कार्यरत आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तृतीयपंथी समुदायाच्या हक्कांसाठी जागृती आणि उपाययोजना करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
त्यांच्या लेखणीमुळे या वंचित गटांच्या समस्या समाजाच्या व शासनाच्या व्यवस्थेकडे प्रभावीपणे पोहोचल्या आहेत.
हा पुरस्कार वितरण समारंभ बुधवार, १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता कुलदैवत आदर्श नगर, नागणे प्लॉट, परांडा रोड, बार्शी येथील काळे निवासस्थानी आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, ग्रामीण पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, सहायक दुय्यम निबंधक ए. एस. बनसोडे, शिवाजी शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रा. अरुण देबडवार, माजी शिक्षणाधिकारी शिवदास नलावडे आणि ज्येष्ठ पत्रकार संतोष सूर्यवंशी यांच्या उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण होईल.
More Stories
गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर
श्री. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत विविध प्रकारचे दाखल्याचे शिबीर आयोजन
कीर्तनकार ह.भ.प. मधुकर महाराज गिरी गोसावी यांचे निधन, वारकरी सांप्रदायासह गोसावी समाजावर शोककळा