करमाळा तालुक्यातील करंजे येथे माजी आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत शुगरकेन हार्वेस्टरचे पूजन करण्यात आले. करंजे येथील अशोक पोपटराव फुके यांनी करमाळा तालुक्यात पहिले शुगरकेन हार्वेस्टर घेत असल्याचे सांगितले जात आहे .
या हार्वेस्टर पूजन झाले . सध्या ऊस उत्पन्नात झालेली वाढ व मिळत नसलेले मजूर यावर पर्याय म्हणून फुके कुटुंबियांनी हे मशीन घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे . त्यामुळे त्यांच्याकडुन शेतकऱ्यांची उसाच्याबाबतीत होत असलेली हेळसांड थांबणार आहे याच्यातून शेतकऱ्यांची सेवा घडणार आहे . शेतकऱ्यांचा आशीर्वाद नक्कीच फुके कुटुंबियांना मिळणार असल्याचे वक्तव्य माजी आमदार नारायण पाटील यांनी या प्रसंगी केले .
यावेळी नामदेवराव साबळे , विलास पवार , शहाजी ठोसर , शशिकांत पवार , जयप्रकाश सरडे , संजय फरतडे , विजयकुमार सोलंकर , धर्मराज तरंगे , राघू उबाळे , उमेश सरडे , संजय सावकार , नवनाथ पवार , बाबासाहेब सरडे , साबळे महाराज , सुग्रीव तरंगे , पीतांबर पवार , प्रभू पवार , बाळू वैद्य , राहुल ठोसर , देवराव सरडे , युवराज तरंगे , सरपंच पांडुरंग हाके , डॉ . राळेभात , डोके , सतीश तरंगे , सुदाम तरंगे , लवटे , विशाल गायकवाड , प्रभू सरडे , विक्रम सरडे , नामदेव सरडे , नितीन पवळ , प्रवीण पवार , गणेश साबळे , शिवाजी सरडे , पोलिस पाटील दादासाहेब सरडे , सरपंच अनिल थोरात , सागर सरडे , अंबादास डोलारे , बाबासाहेब गोसावी , आनंदराव शिंदे , मचिंद्र सरडे , आश्रू तरंगे , पोपट ठोसर , बाबर गुरुजी , साबळे गुरुजी , शहाजी पवार , राजेंद्र सरडे , बारकू सरडे , राजाभाऊ सरडे , तानाजी पवार , बापू गुरव , विजय नगरे , भाऊसाहेब लावंड , रवी सरडे उपस्थित होते . कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक फुके यांनी सूत्रसंचालन डॉ . कोळेकर यांनी केले . आभार रविकिरण फुके यांनी मांडले .
शेती करत असताना अपुरे कामगार व वेळेची बचत करण्यासाठी आधुनिक अवजारे व यंत्रांचा वापर काळाची गरज आहे परंतु मोठय़ा अवजारांच्या किमती ही शेतकर्यांच्या आवाक्याबाहेर असतात परंतु शासनामार्फत अवजारे खरेदी करण्यासाठी अनेक योजना आहेत याचा लाभ शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.
More Stories
बियाणे, औषधे व खते यासाठी महा डीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे आवाहन
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांची सिताफळ संशोधन केंद्रला भेट
दीक्षारंभ कार्यक्रमाअंतर्गत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथील विद्यार्थ्यांच्या कृषि संशोधन केंद्रांना भेटी