Kranti news

विश्वसनीय बातम्या अणि माहिती

Home > ताज्या > कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालय बार्शी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
मित्राला शेअर करा

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालयाचा प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचा प्रथम सत्रामधील परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.

यामध्ये महाविद्यालयाची कु. घाडगे संध्याराणी प्रकाश या विद्यार्थीनीने 86.61% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक संपादन केला. तर कु. बगाडे विमल संतोष या विद्यार्थीनीने 85.47% गुण मिळवत व्दितीय क्रमांक संपादन केला. विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार श्री. बापूसाहेब शितोळे उपस्थित होते. यशस्वी विद्यार्थीनीने स्थानिक व्यवस्थापन समिती यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी प्राचार्य पी. आर. गलांडे, डॉ. डी. बी शिंदे, डॉ. एस. एस. शेंडे, प्रा. व्ही.ई. बोनगे, प्रा. एम. बी जायभाय, कार्यालयीन अधिक्षक मोरे टी. एस. व विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.