बार्शी : सध्या देशात बलात्कार, महिलांवरील अत्याचार सारख्या अनेक घटना घडल्या आहेत. मुली व महिलांनी अशा नराधमांना वेळीच रोखण्यासाठी स्वतःचे संरक्षण करणे गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन नारीशक्तीच्या सन्मानार्थ मावळा ग्रुपच्या गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत कर्मवीर ढोल ताशा ध्वज पथकच्या वतीने “स्त्री जर ढोल ठोकू शकते तर वेळ आल्यावर नराधमाला पण ठोकू शकते…” आणि ” बाप्पा आणि बाप दोघांनी सांगितलंय.. कोणी छेडले तर तूच दुर्गा हो…” असा आक्रमक संदेश देण्यात आला.

महिला वर्गाने या संकल्पनेचे कौतुक केले.
तसेच मिरवणुक यशस्वी करण्यासाठी पथकाचे अध्यक्ष उमेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख प्रवीण परदेशी, हर्षद लोहार, अविनाश बोकेफोडे व पथकातील सर्व वादक प्रतिनिधींनी परिश्रम घेतले.

More Stories
आयडियल इंग्लिश स्कूलमधील चिमुकल्यांच्या कलागुणांनी गावकरी भारावले
जी. डी. सी. अँन्ड ए. व सी. एच. एम. परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदवाढ
संत गोरोबाकाका मंदिराची प्रस्तावित नवीन कमान महाद्वाराची जागा बदलण्याची तेर ग्रामस्थांची मागणी